लॉकडाऊनमध्ये केलं लग्न, अनलॉक होताच बायको नवऱ्याला सोडून फरार!

लॉकडाऊनमध्ये केलं लग्न, अनलॉक होताच बायको नवऱ्याला सोडून फरार!

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला. पण या लॉकडाऊनमध्ये अनेक लग्नाबाबत घटना घडल्या आहेत. कोणी लॉकडाऊनमध्ये आपली बायको माहेरी अडकल्यामुळे दुसरी सोबत लग्न उरकून घेतंल. तर बायको इतर कोणासोबत पळून गेली, अशा अनेक प्रकारच्या घटना लॉकडाऊनमध्ये घडल्या आहेत. अशी एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा शहराजवळ स्थित असलेले मैनपुरीहून लॉकडाऊनमध्ये लग्न करून आलेली बायको अनलॉकमध्ये फरार झाल्याची घटना घडली आहे. बायको लग्नानंतर जवळपास सहा महिन्यानंतर घरातील दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली आहे. कुटुंबियांनी तिचा शोध घेतल्यानंतर ती काही कुठेही भेटली नाही आहे. त्यामुळे आता संतप्त झालेल्या नवऱ्याने शहरातील कोतवाली येथे तक्रार दिली आहे.

माहितीनुसार, मैनपुरी येथील पोलीस स्टेशन एलाऊ इलाबांस भागातील एका तरुणाचे सहा महिन्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यांत लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस संसार सुरळीत सुरू होतो, परंतु एका महिन्यानंतर बायको नाखूश असल्यामुळे ती निघून गेली. पण लोकांनी समजवल्यानंतर बायको पुन्हा सासरी आली. मंगळवारी सकाळी तरुण बायकोसोबत नातेवाईकांकडून घरी परत येत होता. यादरम्यान ईशन नदी पुलावर उतरल्यानंतर तरुण एलाऊ जाणाऱ्या बसमध्ये सामान ठेवतं होता. याचवेळेस बायकोने तिथून पळ काढला. तो बायकोला आवाज देण्यासाठी गेल्या तर बायको तिथून फरार झाली होती.

पीडित तरुणाने बस मधून उतरुन बराच वेळ बायकोचा शोध घेतला. पण ती भेटली नाही. तरुणाने पोलिसांना सांगितले की, ‘त्याच्या रंगरुपावरून बायको त्याच्यापासून दूरच राहत होती.’ आश्चर्याची बाब म्हणजे त्याची बायको दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे. या प्रकरणी तरुणाने बुधवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


हेही वाचा – मेव्हण्याने मेव्हणीचा खून करुन आत्महत्या केली; कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल