तर इराणवर करू मोठा हल्ला, ट्रम्प यांची धमकी

Trump threatens to retaliate with '1,000 times greater' force against any Iran attack

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिकेविरुद्ध कोणताही हल्ला कराल तर त्याच्या प्रत्युत्तरात एक हजार पट मोठा हल्ला केला जाईल.’ दरम्यान जानेवारीत झालेल्या इराणच्या टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची योजना आखली जात असल्याचे माध्यमातून समोर येत होते. याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे.

इराणने दक्षिण आफ्रिकेतील अमेरिकेच्या राजदूताच्या हत्येचा कट रचल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला धमकी देत म्हणाले की, ‘जर इराणने कासिम सुलेमानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिका किंवा अमेरिकेच्या लोकांवर हल्ला केला तर इराण केलेल्या हल्ल्याच्या एक हजार पट मोठ्याने हल्ल्याचे प्रत्युतर देऊ.’

याबाबात ट्विटरवर देखील ट्रम्प म्हणाले आहे की, ‘इराण कासिम सुलेमीन हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकन राजदूत किंवा अमेरिकविरुद्ध इतर कोणत्याही हल्ल्याचा कट रचत आहे. दरम्यान भविष्यात अमेरिकन सैनिकांवर होणारे हल्ले आणि अमेरिकन सैनिकांची हत्या रोखण्यासाठी कासिम सुलेमानी यांच्या हत्या करण्यात आहे.’

एकीकडे जगभरात कोरोना व्हायरल थांबायचे नाव घेत नाही आहे. तर दुसरीकडे देशा-देशांमध्ये तणाव निर्माण होताना दिसत आहे. भारत-चीनमध्ये देखील सीमेच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या ६७ लाख ८८ हजारांहून अधिक असून २ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – संपूर्ण देश शूर सैनिकांच्या मागे