केरळच्या शबरीमला मंदिराला भेट देणार – तृप्ती देसाई

केरळच्या प्रसिध्द शबरीमाला मंदिराला येत्या १७ नोव्हेंबर रोजी तृप्ती देसाई भेट देणार

Kerala
Trupti Desai
तृप्ती देसाई

केरळच्या प्रसिध्द शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यावरुन सुरु झालेला वाद थांबायचे नाव घेत नाहीये. आज देखील महिलांना अयप्पाचे दर्शन करु दिले जात नाही आहे. हा वाद सुरु असतानाच आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृत्पी देसाई यांनी या मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात तृप्ती देसाई यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्र लिहीले असून सुरक्षेची मागणी देखील या पत्रात केली आहे. यावेळी तृप्ती देसाईंसोबत सहा महिला देखील असणार आहेत. येत्या १७ नोव्हेंबर रोजी तृप्ती देसाई शबरीमला मंदिरात प्रवेश करणार आहेत.

तृप्ती देसाईंनी केली सुरक्षेची मागणी

केरळमधील शबरीमला मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा असा ऐतिहासिक निर्णय न्यायालयानं दिला. या निर्णयानंतर महिलांनी मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, भक्तांनी त्यांना विरोध करत मोर्चे देखील काढले. याप्रकरणी एक पुनर्विचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी मंदिर उघडण्यात आले होते. त्यानंतर महिला दर्शनासाठी निघाल्या होत्या. मात्र ६ नोव्हेंबरला पुन्हा एकदा हिंसाचार घडला होता. या हिंसाचारामध्ये महिला आणि कॅमेरामन जखमी झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर तृप्ती देसाईंनी सुरक्षेची मागणी करणारे पत्र पी. विजयन यांना लिहिले आहे.


संबंधित बातम्या – 

वाचा – शबरीमला मंदिर सर्वधर्मीयांसाठी खुलं – न्यायालय

वाचा – शबरीमला, कोर्टाचा निर्णय आणि सामाजिक सुधारणा