जम्मू-काश्मीर: शोपियानमधील चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशवाद्यांना केले ठार

जम्मू-काश्मीर: शोपियानमधील चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशवाद्यांना केले ठार

जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथे सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. शोपियानमधील चकमकीत सुरक्षा दलाला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सध्या आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. माहितीनुसार, शोपियानच्या कुटपोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिस, सैन्य आणि 34RR आणि सीआरपीएफच्या एका पथकाने शोध मोहीम राबविली.

या शोध मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी स्वतःला वेढलेले पाहून त्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी सुरक्षा दलाने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली तेव्हा दोन दहशतवादी ठार झाले. पण अद्याप ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही आहे. याबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘या दहशतवाद्यांना यापूर्वी शरण येण्याची संधी देण्यात आली होती, परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला.’

दरम्यान एलओसीच्या अलीकडे पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे लाँचिंग पॅड पुन्हा सक्रिय झाले आहेत. जवळपास ३०० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. भारतीय गुप्तहेर एजेंसीला मिळालेल्या पाकिस्तान असलेल्या दहशतवादी कमांडरांना निर्देश दिले आहेत की, ‘बर्फवृष्टीमुळे घुसखोरीच्या इनफिल्ट्रेशन पासिस बंद होण्यापूर्वी दहशतवाद्यांना खोऱ्यात जाण्यात प्रयत्न वाढवावा.’ यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये एलओसीवर हे ऑपरेशन झाले. यावेळी सैन्य दलाचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले होते.


हेही वाचा – आपण कोरोनाशी लढताना थकलो असू, पण कोरोना अजूनही थकलेला नाही – WHO