घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटआयसोलेशनमध्ये केस कापणं पडलं महागात, भरावा लागला लाखोंचा दंड!

आयसोलेशनमध्ये केस कापणं पडलं महागात, भरावा लागला लाखोंचा दंड!

Subscribe

कोरोनामुळे संपूर्ण जग बंद आहे. गेले ४ महिने घरातच आहेत. अशा परिस्थिती घरातून बाहेर पडण्यासाठी लोकही आता कराणं शोधू लागली आहेत. असाच काहीसा प्रकार ब्रिटनमध्ये घडला आह. ब्रिटनमध्ये असणाऱ्या व्यक्तीला सेल्फ आयसोलेशनमध्ये असताना त्याची एक चूक महागात पडली आहे. क्वारंटाइनमध्ये हा माणूस केस कापायला सलूनमध्ये गेला, नियम मोडल्याप्रकरणी त्याला चक्क ७६०० डॉलरचा दंड बसला

कारण दोन आठवड्यांसाठी या व्यक्तीला सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्यासा सांगण्यात आले होते. या दरम्यान घरातून बाहेर पडायला आणि इतरांना भेटायला या व्यक्तीला मनाई करण्यात आली होती. ३ जुलैला गॅरेथ ले मॉनिअर नामक इसमानं आपल्या पत्नीसमवेत ग्वेर्नसे बेटावर फिरायला गेला. या ३७ वर्षीय व्यक्तीला क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र सेल्फ आयसोलेशनचा कालावधी संपण्याआधी हा गॅरेथ केस कापायला गेला. त्यानंतर गॅरेथ विरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याच्याविरुद्ध कोर्टात साक्षीदारही होते. या सगळ्यात गॅरेथला भारतीय रुपयानुसार तब्बल ५ लाख ६७ हजार ५३३ रुपयांचा दंड भरावा लागला.

- Advertisement -

तपासादरम्यान सेल्फ आयसोलेशनमध्ये असताना या व्यक्तीने नियम मोडल्याचे निष्पण्ण झाले. हे प्रकरण न्यायालयात पोहचले. जेथे गॅरेथ विरोधात न्यायालयाने निर्णय दिला. या प्रकरणी न्यायाधिशांनी ७६०० डॉलरचा दंड ठोठावला आहे.


हे ही वाचा – संतापजनक! घरात लहान मुलं, वयोवृध्द असतानाही पालिकेने ठोकले पत्रे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -