‘मास्क घालणाऱ्यानांच कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होतो’

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचे WHO पासून अनेक देशांच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. भारतात देखील सरकारच्यावतीने ‘Mask is Must’ हे अभियान सुरु आहे. मास्क शिवाय सरकारी कार्यालय किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरता येणार नाही, असे नियम करण्यात आले आहेत. मात्र काही लोक अजुनही कोरोनाला गंभीरतेने घेत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील बेजबाबदार वक्तव्य करुन कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे वरचेवर दिसून येत आहे. सध्या त्यांच्या नव्या वक्तव्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. मास्क घालणाऱ्यांनाच कोरोनाचा संसर्ग लवकर होतो, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. मात्र आपल्या वक्तव्याला साजेशे पुरावे त्यांनी दिलेले नाहीत. ते स्वतः देखील अनेक दिवस मास्क वापरत नव्हते. सार्वजनिक कार्यक्रमात देखील ते मास्क न घालताच जात होते.

गुरुवारी एनबीसी न्यूज टाऊन हॉल येथील एका कार्यक्रमात बोलत असताना ट्रम्प यांनी मास्क न वापरण्यावर आपले एक्पर्ट कमेंट केली. या कार्यक्रमादरम्यान पत्रकाराने त्यांना २६ सप्टेंबरच्या एका कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारला. ज्यामध्ये जाहीर कार्यक्रम असूनही अनेकांनी मास्क घातला नव्हता. या कार्यक्रमानंतरच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे या सभेत मास्क न घातल्यामुळे त्यांना संसर्ग झाल्याचा कयाब बांधला जात होता. या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, मास्क घालणाऱ्या लोकांनाच कोरोनाचा संसर्ग होत आहे.

तर दुसऱ्या बाजुला अमेरिकेच्या महामारी नियंत्रण विभागाने मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आपण अशा परिस्थितीतून जात आहोत, जिथे लस यायला उशीर होणार आहे. त्यामुळे लोकांनी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हाच एकमेव खबरदारीचा उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रम्प यांनी मास्क उतरवून फेकून दिला

ट्रम्प हे नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. पेन्सिलविनिया येथे एका रॅलीला संभोधित करत असताना ट्रम्प यांनी चेहऱ्यावरचा मास्क काढून कार्यकर्त्यांच्या दिशेने भिरकवला. जाहीर कार्यक्रमात विनामास्क जाणे, हे ट्रम्प पहिल्यांदाच करत नाहीयेत. याआधी देखील त्यांनी पत्रकारांसमोरच आपला मास्क उतरवून फेकला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क काढून फेकला