Corona: चष्मा घालणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी!

Wearing eyeglasses may lower the risk of Covid-19: Study
Corona: चष्मा घालणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी!

कोरोना व्हायरस या महामारीचा संपूर्ण जगावर मोठा परिणाम झाला आहे. या महामारीमुळे लोकांची जीवनशैलीत बदल झाला आहे. जगभरात कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक वैज्ञानिकांचे संशोधन सुरू आहेत. या संशोधना दरम्यान कोरोना संदर्भातील अनेक आश्चर्यचकीत करणारे खुलासे होत आहेत. दरम्यान एका संशोधनानुसार असे समोर आले आहे की, ‘चष्मा घालणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसचे लागण होण्याचे प्रमाण कमी असू शकते. कारण कोरोना व्हायरस डोळ्यांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो.’ हे संशोधन चीनच्या सुइझोउ प्रांतात केले गेले आहे. या संशोधनात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या २७६ रुग्णांचा समावेश होता.

जामा ऑप्थॅल्मोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ‘त्यांनी या विषयाचा गांभीर्याने विचार केला. चष्मा कशाप्रकारे डोळ्यांना फायदेशीर ठरतो यावर त्यांनी संशोधन केले. या संशोधनात असे दिसू आले की, सामान्य लोक प्रति तासाला सुमारे १० वेळा डोळ्यांना स्पर्श करतात. डोळे ही देवाची अनोखी देणगी आहे. जी अतिशय कोमल आणि नाजूक आहे. डोळ्यांमध्ये सुरक्षेची कमतरता असते, ज्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढतो.’

‘SARS-CoV-2 रिसेप्टर एंजियोटेंसीन-कन्व्हर्टींग एन्झाइम २ नेत्र पृष्ठभागात स्थित आहे. या माध्यमातून SARS-CoV-2 शरीरात प्रवेश करू शकतो. याशिवाय SARS-CoV-2 नाका नळीतून आणि श्वासाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. यामुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. सध्याच्या आकडेवारीनुसार, जवळपास १ ते १२ टक्के रुग्णांना डोळ्यांमुळे कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोना व्हायरसचा रुग्णाच्या तपासणीत कोरोना अश्रूत आढळला आहे. त्यामुळे डोळे कोरोना व्हायरसला मानवी शरीरात प्रवेश करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतात. याकरिता चष्मा कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी मदत करते. म्हणून लोकांनी दररोज चष्माचा वापर केला पाहिजे, यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता कमी होते’, असे संशोधनात म्हटले आहे.


हेही वाचा – Corona पॉझिटिव्ह असतानाही कॉन्स्टेबलने बर्थडे पार्टीत ठेका धरला आणि नोकरी गमावून बसला