५ राज्यांमध्ये काँग्रेस आणणार भाजपच्या ‘नाकी दम’?

मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुका आजच पार पडल्या. यावेळी जनता कोणला पसंती देणार यावरील सर्वच एक्झिट पोल आता बाहेर येऊ लागले आहेत.

Mumbai

मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुका आजच पार पडल्या. यावेळी जनता कोणला पसंती देणार यावरील सर्वच एक्झिट पोल आता बाहेर येऊ लागले आहेत. आरोप- प्रत्यारोपांनी पाचही राज्यांची निवडणूक चांगलीच गाजली. त्यामुळे माय- बाप जनता कुणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ११ डिसेंबर रोजी चारही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागणार असला तरी २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पिछेहाट झालेली काँग्रेस मात्र मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये उभारी घेताना दिसून येत आहे. यावर आता टाईम्स नाऊ आणि सीएनएक्सचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत.

टाईम्स नाऊ आणि सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार आता मध्यप्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसला सत्तेची समान संधी आहे. पण, इतर उमेदवारांचं किंवा पक्षांची त्यांनी मदत घ्यावी लागणार आहे. तर, राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसला बहुमत मिळणार असं टाईम्स नाऊ आणि सीएनएक्सच्या एक्झिटच्या पोलचं म्हणणं आहे. तसेच तेलंगनामध्ये मात्र टीआरएस सत्ता कायम राखणार आहे. यावेळी काँग्रेस दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या स्थानावर असेल. छत्तीसगडमध्ये देखील सत्ताधारी भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसला याठिकाणी धोबीपछाड मिळणार आहे.

कुणाला मिळणार खुर्ची? काय सांगतो एक्झिट पोल?

१ ) मध्यप्रदेश – जागा २३०

सत्तास्थापनेसाठी आवश्यक जागा – ११६

काँग्रेस – ११०

भाजप – ११०

बसपा – ०० 

इतर – १०

२ ) राजस्थान – जागा १९९

सत्तास्थापनेसाठी आवश्यक जागा – १०१

काँग्रेस – १०८

भाजप – ८१

बसपा – ०१

इतर – ००

३ ) तेलंगना – जागा ११९

सत्तास्थापनेसाठी आवश्यक जागा – ६०

टीआरएस – ७६

काँग्रेस + इतर – ३२

भाजप – ०४

इतर – ०७

४ ) छत्तीसगड – जागा ९०

सत्तास्थापनेसाठी आवश्यक जागा – ४६

काँग्रेस – ४५

भाजप – ३९

भाजप – ०६

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here