घरदेश-विदेशहनीमूनसाठी पत्नीला दार्जिलिंगला नेलं; पत्नीनं मागितला घटस्फोट

हनीमूनसाठी पत्नीला दार्जिलिंगला नेलं; पत्नीनं मागितला घटस्फोट

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये एका दाम्पत्याचं हनीमूनच्या जागेवरुन मोठं भांडण झालं आहे. हे भांडण इतकं मोठं होतं की संपूर्ण देशभरात या भांडणाची चर्चा सुरु आहे. आपण लग्न करुन स्विर्त्झलँडला हनीमूनसाठी जावं, अशी पत्नीची अपेक्षा होती. मात्र, लग्न झाल्यानंतर पतीने तिला दार्जिलिंगला नेलं. त्यामुळे पत्नी प्रचंड संतापली. दार्जिलिंगला गेल्यावर पत्नीने आपल्या पतीसोबत मोठा हंगामा केला. तिथं त्यांचं कडाक्याचे भांडण झालं. या भांडणांतर पत्नीनं आपल्या पतीकडं घटस्फोटाची मागणी केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये १० नोव्हेंबर २०१६ रोजी एका दाम्पत्याचे लग्न झालं होतं. लग्नाअगोदर पतीनं आपल्या पत्नीला हनीमूनसाठी स्वीर्त्झलँडला घेऊन जाईल, असा शब्द दिला होता. मात्र, पतीनं दिलेला शब्द पाळला नाही. पतीनं स्विर्त्झलँडचं नाव सांगून दार्जिलिंगचं तिकीट बूक केलं होतं. त्यामुळे पत्नी नाराज होती. पतीनं तिची मनधरणी करण्याचा बराच प्रयत्न केला. अखेर पतीला त्यात यश आलं. मात्र, दार्जिलिंगला गेल्यावर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. दरम्यान, पत्नीनं केलेल्या अपमानामुळे पतीही नाराज झाला. त्यामुळे दोघांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -