झारखंडमध्ये निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; नवऱ्याला अटक

झारखंडमध्ये सामुहिक बलात्काराच्या घटनेमध्ये महिलेच्या अगोदरच्या पतीला अटक करण्यात आली आहे. बलात्कारानंतर महिलेच्या गुप्तांगामध्ये काठी टाकली गेली.

JAMTARA
gang rape on minor girl in virar
प्रातिनिधक फोटो

झारखंडमध्ये निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. झारखंडमध्ये झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेनं झारखंड हादरून गेलं आहे. बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगामध्ये काठी टाकली गेली. त्यानंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे.  पीडित महिला चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेली होती. यावेळी पीडितेच्या अगोदरच्या पतीनं आणखी दोन साथीदारांच्या साथीनं महिलेचं अपहरण केलं. त्यानंतर तिला शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावरच हे नराधम थांबले नाहीत. तर त्यांनी तिच्या गुप्तांगामध्ये काठी देखील घातली. यानंतर तिनही नाधमांची घटनास्थळावरून पळ काढला. पहाटे ज्यावेळी महिला मदतीसाठी वेदनेनं विव्हळत होती. त्यावरून शेतात गेलेल्या लोकांच्या ध्यानात ही बाब आली. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पीडित महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली.

दरम्यान, पोलिसांनी महिलेच्या अगोदरच्या पतीला बेड्या ठोकल्या आहेत. तर नराधमाचे दोन साथीदार फरार आहेत. पोलिस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here