‘या’ तरुणाने टॅटू गोंदवून शहीद जवानांना वाहिली अनोखी श्रद्धांजली

गोपाल सारण असं या तरुणाचं नाव आहे. त्याने ७१ जवानांचे नावं आपल्या शरीरावर गोंधवले आहेत.

Bikaner
youth inked tattoo of martyr on his body and give tribute to martyr
गोपाल सारण असं या तरुणाचं नाव आहे. त्याने ७१ जवानांचे नावं आपल्या शरीरावर गोंधवले आहेत.

पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला घडला. या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर देशभरातून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. कुणी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहे तर कुणी कॅन्डल मार्च काढून शहीद जवांना श्रद्धांजली वाहत आहेत. मात्र, राजस्थानमधील एका जवानाने ७१ शहीद जवानांचे नाव आपल्या शरीरावर गोंधवून अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

तिरंगा झेंडाही पाठीवर गोंधला

गोपाल सारण असं या तरुणाचे नाव आहे. तो राजस्थानच्या बिकावनेर जल्ह्यातील मोमासर गावाचा रहिवाशी आहे. त्यांने आपल्या शरीरावर शहीदांचे नाव गोंदले आहे. यामध्ये पुलवामा येथे शहीद झालेल्या ४२ जवानांचे नावं आहेत. त्याचबरोबर बिकानेर जिल्ह्यात शहीद झालेले २० आणि रतनगढचे ९ जवानांचे नावं आहेत. त्याचबरोबर गोपालने पाठीवर तिरंगा झेंडाही गोंदवला आहे त्याचबरोबर त्याने पाठीवर शहीद स्मारकही बनवले आहे. बिकानेर येथे शहीद जवांनाचे स्मारक नाही, अशी खदखद गोपालने व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here