घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाइंटरनेटबद्दल जागृती करणारा निशा पंदेरे यांचा बाप्पा

इंटरनेटबद्दल जागृती करणारा निशा पंदेरे यांचा बाप्पा

Subscribe

मालाड येथे राहणाऱ्या निशा पंदेरे मागच्या ९ वर्षांपासून आपल्या घरी इको फ्रेडंली गणेशोत्सव साजरा करत आहेत. यावर्षी त्यांनी इंटरनेट ‘शाप की वरदान?’ या विषयाला घेऊन गणपतीची सजावट केली आहे. इंटरनेट ज्ञानाचे उत्तम साधन आहे. पण दिवसेंदिवस नवीन नवीन सोशल नेटवर्किंग साईट्स येत असल्यामुळे तसेच ऑलनाईन गेमींगमुळे लहानथोरांपासून सर्वच त्यात वाहत जात आहेत. मोबाईलचे हे व्यसन आता घातक बनत चालले आहे. ऑनलाईन गेम्समुळे कित्येकांचे प्राणही गेले आहेत. मोबाईलमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थही बिघडले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचा त्रास होतोच. त्यामुळे बाप्पांच्या माध्यमातून निशा पंदेरे यांनी इंटरनेट, मोबाईल गेम्सबद्दल जागृती करणारा देखावा तयार केला आहे.

सजावटीसाठी कागद आणि पुठ्ठा वापरण्यात आला आहे. बाप्पा आपल्या घरी यावा असे प्रत्येकालाच वाटतं. मात्र पीओपीच्या मुर्तींमुळे पर्यावरणाची हानी होते. पर्यावरणाची हानी कमी व्हावी, यासाठी आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासा सुरुवात केल्याचे निशा पंदेरे सांगतात.

- Advertisement -

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा


स्पर्धकाचे नाव – निशा पंदेरे

- Advertisement -

पत्ता – Room no 3 chawl no 12 Chachi chi chawl maqbool compound pathanwadi, Malad East Mumbai 400097

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -