Viral Video: एअरपोर्टवर मिल्खा सिंह यांना पाहताच उर्वशी रौतेलाने धरले पाय

उर्वशीचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओ लाईक्स वर्षाव होत आहे.

actress urvashi rautela touched her feet on seeing milkha singh at the airport the video viral on social media
एअरपोर्टवर मिल्खा सिंह यांना पाहताच उर्वशी रौतेलाने धरले पाय

अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी ती नेहमी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक देखील केले आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी ‘द फ्लाइंद सिख’ मिल्खा सिंह यांच्या पाया पडताना दिसत आहे. उर्वशीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून या व्हिडिओ लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

उर्वशीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘एक महान व्यक्ती मिल्खा सिंह यांची भेट होणे हा एक खरंच चमत्कारी भावनेचा अनुभव होता.’ यादरम्यान उर्वशीने मिल्खा सिंह यांच्यासोबत फोटो काढले आहेत.
आतापर्यंत उर्वशीने शेअर केलेल्या व्हिडिओला ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी उर्वशीने अभिनेता हृतिक रोशनबरोबर नाव जोडण्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. ती म्हणाली होती की, टतिच्यावर सर्व खोटे आरोप करण्यात आले होते की, ती हृतिक रोशनसोबत सकाळी २ ते ४ वाजेपर्यंत फोनवर बोलत असे. हे खोटे आरोप सेलिब्रिटींना त्रास पोहोचवतात, मग ते स्टार किड असो किंवा बाहेरील व्यक्ती.’ सध्या उर्वशी आगामी तेलुगू चित्रपट ‘ब्लॅक रोज’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.


हेही वाचा – सलमानच्या ड्रायव्हर आणि दोन स्टाफला कोरोनाची लागण