मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स, धोका आणि शोध; ‘बदला’ चा ट्रेलर लाँच!

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या सुंदर अभिनयाने नटलेला आणखी एक दमदार चित्रपट बदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mumbai
badla movie
बदला चित्रपटाचे पोस्टर

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या सुंदर अभिनयाने नटलेला आणखी एक दमदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खून, हत्या, प्रेम, विवाहबाह्य संबंध, गूढ, शोध, ड्रामा यांनी नटलेला बदला हा आगामी चित्रपट हे दोन खमके कलाकार प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. हा नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून बिग बी आणि तापसी पन्नू यांच्या अभिनयाची जुगलबंदी यामध्ये पाहायला मिळत आहे. येत्या ८ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. रेड चिलीजची निर्मिती असलेल्या बदला चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे.

‘पिंक’नंतर ‘बदला’ची उत्सुकता

यापूर्वी अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांनी पिंक हा सिनेमा एकत्र केला आहे. समाजातील महिलेचं नेमकं स्थान आणि यावर केलेले भाष्य त्यामुळे पिंक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. वकिलाच्या भूमिकेतील बिग बी आणि स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढणारी तापसी यांच्या अभिनयामुळे पिंक चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता पुन्हा एकदा बदलाच्या निमित्ताने दोघांमधील अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शिवाय चित्रपटाचा ट्रेलर पाहून यातील सस्पेन्स जाणून घेण्याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.