Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन विरुष्काच्या 'बेबीगर्ल'चा नवा फोटो व्हायरल

विरुष्काच्या ‘बेबीगर्ल’चा नवा फोटो व्हायरल

या फोटोमध्ये एक गोंडस चिमुकली दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

भारतीय  क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात नुकत्याच एका गोंडस चिमुकलीचे आगमन झाले. अनुष्काने सोमवारी दुपारी एका गोंडस मुलीला जन्म दिल्याने बाबा विराटचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विराटने स्वत; ट्विट करत बाबा झाल्याची आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली. त्यानंतर  विराट-अनुष्काच्या मुलीचा पहिला फोटो समोर आला होता. विराटचा भाऊ म्हणजेच बाळाच्या काकाने इन्स्टाग्रामवरुन विराट-अनुष्काच्या मुलीचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

परंतु  विराट-अनुष्काच्या बाळाचा एक नवा फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक गोंडस चिमुकली दिसत आहे. हा फोटो अनुष्का आणि तिच्या चिमुकलीचा असल्याचे सांगत व्हायरल केला जात आहे. परंतु हा फोटो खरचं अनुष्का आणि तिच्या मुलीचा आहे का याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
नुकताच विराटच्या भावाने विकास कोहलीने त्यांच्या सोशल मीडियावर आपल्या पुतणीचा पहिला वहिला फोटो शेअर केला आहे. घरी आली नवी ऐंजल असे म्हणत काकाने आपल्या पुतणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत विरूष्काच्या घरी आलेल्या नाजूक चिमुकचीचे इवलेशे पाय दिसत आहेत. विरूष्काच्या छोट्या परिचा पहिला फोटोवर चाहत्यांच्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. तर फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा भडीमार केला आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छासाठी मनापासून आभार. अनुष्का आणि आमची दोघीही सुखरूप आहेत. आम्ही दोघेही भाग्यवान आहोत की आम्हाला आयुष्यातील हा चाप्टर अनुभवण्याची संधी मिळाली’, अशी पोस्ट विराटने केली होती. परंतु व्हायरल होणाऱ्या या नव्या फोटोबद्दलची माहिती जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

- Advertisement -