अॅवेंजर्स एंडगेमचा दमदार ट्रेलर रिलीज

गेल्या अनेक दिवसांपासूनची अॅवेंजर्स सीरजच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शीत झाला असून चाहत्यांनी त्याला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

Mumbai
avengers endgame trailer release
अॅव्हेंचर्स एंडगेम

सर्वात मोठा हॉलिवूडपट असलेल्या अॅवेजर्स चित्रपटाच्या सिरीजचा अॅवेंजर्स एंडगेमचा ट्रेलर रिलीज झाला आहे. कॅप्टन मार्वेलच्या या एवेंजर सिरीजमधील कॅप्टन अमेरिका द फस्ट अॅवेंजर या अॅवेंजर पासून सुरुवात झालेल्या या प्रवासत अ‍ॅव्हेंजर्स सिरिजच्या द एंडगेम या भागात देखील कप्टन अमेरिका या अॅवेंजरला हायलाईट करण्यात आले आहे. थोर, हॉक आय, ब्लॅक विडो, हुल्कस या अॅवेजर्सचा प्रत्येकाचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. भारतात या चित्रपटाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. २०१२ साला पासून अॅवेंजर्स सिरीजला सुरवात झाली. मार्वल स्टूडिओजने या सिरीजची निर्मीती केली आहे. अॅवेंजर्स एंडगेम हा या सिरीज मधील शेवटचा भाग ठरणार आहे.

काय आहे ट्रेलर

या ट्रेलरमध्ये इनफिनिटी वॉर या मागिल भागात थानोस द्वारा मारल्या गेलेल्या सुपर हिरोज नंतर उरलेले हिरो पृथ्वीला वाचवण्यासाठी काय निर्णय घेतात, थानोसला हरवण्यासाठी एवेंजर्स कोणती शक्कल लढवणार, थारोस काय करणार याची एक झलक दाखवण्यात आली आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून आता पर्यंत तब्बल ३ करोड पेक्षा अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. हा ट्रेलर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती २६ एप्रिलची कारण याच दिवशी चित्रपट प्रदर्शित होत आहे.

मोठ्या कमाईची अपेक्षा

दरम्यान, या चित्रपटाच्या सिरीजच्या मागील भागाने म्हणजे एवेंजर्स इनफिनिटी वारने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड केले होत. या भागात थानोस कडून अनेक एवेंजर्सचा खातमा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे एंडगेममध्ये एवेंजर्स काय करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अॅवेंजर्स एंडगेममध्ये शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार करताना अॅवेंजर्स दिसत आहेत. हा चित्रपट १८० मिनिटींचा म्हणजे ३ तासांचा असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रुसो चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी भारतात येणार आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here