घरमनोरंजनबायोपिकपूर्वीच सनीबद्दल जाणून घ्या ‘या’ पाच गोष्टी

बायोपिकपूर्वीच सनीबद्दल जाणून घ्या ‘या’ पाच गोष्टी

Subscribe

पॉर्न चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणाऱया सनीच्या जीवनातील कधीही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या.

संजू चित्रपटानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा ‘बायोपिक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसातच सनीचे जीवन प्रेक्षकांसमोर सादर केले जाईल. ‘करणजीत कौरः द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या चित्रपटाचा टिझर नुकताच सनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. सनीच्या जीवनावर आधारित या चित्रपटात तीच्या शालेय जीवन ते बॉलिवूड अभिनेत्री बनन्याचा प्रवास बघायला मिळणार आहे. बॉलिवूडमध्ये वेगळीच ओळख असलेल्या सनीचा जीवनप्रवास बघण्यास लोकांमध्ये उत्सुकता आहे. म्हणूनच सनीच्या जीवनातील कोणालाही न माहिती असलेल्या पाच गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

- Advertisement -

शाळेत असताना झाला होता पहिला प्रेमभंग

Sunny Leone childhood

- Advertisement -

शाळेत असलेल्या प्रियकाराने सनीला अनेक प्रेमपत्र लिहीली होती. रोमियो-जूलियट नाटक पाहिल्यानंतर सनीने पहिल्यांदा किस केले होते. सनी शाळेत असताना त्यांच्या कुटुंबीयांनी मिशिगन शहराहून कॅलिफोर्नियाकडे स्थलांतर केले होते. त्यामुळे सनी या प्रियकरापासून दूर निघून गेली.

हायस्कूलमध्ये प्रेम करत असताना वडिलांनी पकडले

Sunny Leone childhood

सनी घरातल्यांशी खोट बोलून अनेक वेळ शाळेत घालवत होती. अभ्यासाच्या नावाखाली शाळेच्या परिसरातच आपल्या बॉयफ्रेंड सोबत वेळ घालवत होती. बॉयफ्रेंड बरोबर प्रेमाचे चाळे करत असताना वडिलांनी तिला रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी ‘गोगू’ नावाने तीला ओळखले जात होते. वडिलांनी तिला गाडीत बसायला सांगून घरी नेले. तो आपल्या आयुष्यातील लार्जिवानाक्षण असल्याचे तीने सांगितले.

लहानपणी ग्लॅमरपासून दूर

glamorous sunny leone

आपल्या ग्लॅमरस लुकने सर्वांना घायाळ करणारी सनी लहान असताना ग्लॅमर पासून दूर राहत होती. तीची केस बांधायची पद्धत खूप साधी होती. तसेच तीच्या पायावर केस असल्याने तीला लोक चिडवत होते.

पडद्यावरच नाही तर जीवनातही धाडसी

action sunny leone

सनीच्या मागील जीवनाबद्दल नेहेमीच तीला ऑनलाइन अनेकजण शिव्या देत असतात. सनीचे जितके चहाते आहेत तीतकेच तीचे वाईट बघणारेही लोक आहेत. अनेकदा तीला मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. सनीचा पती बाहेर गावी गेलाज असताना असाच एक इसम तीच्या घराबाहेर येऊन आरडा ओरडा करायला लागला. त्यावेळी न घाबरता हाथात चाकू घेऊन दरवाज्याजवळ गेली होती.

‘कलयूग’ चित्रपटातून करणार होती बॉलिवूडमध्ये प्रवेश

kalyug

 

‘जिस्म-2’ हा सनीचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे. मात्र मोहित सूरीच्या ‘कलयूग’ चित्रपटासाठी सनीला ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी तिने 1 दशलक्ष डॉलर्सची मागणी केली होती. मात्र तेवढे बजेट नसल्यामुळे सनीला या चित्रपटात घेता आलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -