घरताज्या घडामोडी'रिंकिया के पापा' या भोजपुरी गाण्याचे संगीतकार धनंजय मिश्रा यांचे निधन

‘रिंकिया के पापा’ या भोजपुरी गाण्याचे संगीतकार धनंजय मिश्रा यांचे निधन

Subscribe

आज बॉलिवूडचे प्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक बासु चटर्जी यांच्या निधन झाले. या एका धक्क्यातून सावरत नाहीत तोवर दुसरा धक्का बसला आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील ‘रिंकिया के पापा’ फेम प्रसिद्ध संगीतकार धनंजय मिश्रा यांचे निधन झाले. भोजपुरी मेगास्टार मनोज तिवारी यांच्या ‘रिंकिया के पापा’ या लोकप्रिय गाण्यासह अनेक अल्बम आणि चित्रपटांमधील गाणी संगीतबद्ध केली आहेत. संगीतकार धनंजय मिश्रा यांच्या निधनानंतर ईशान्य दिल्लीचे खासदार आणि भोजपुरी मेगास्टार मनोज तिवार यांनी आपला लहान भावाच्या निधनामुळे धक्का बसल्याचे सांगून शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मी ४५०० गाणी गायली आहेत. ज्यामध्ये १५०० गाण्यांना धनंजय मिश्रा यांनी संगीतबद्ध केलं आहे.

- Advertisement -

तसेच भोजपुरी स्टार निरहुआ आणि खेसारी लाला यादव यांनी देखील सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भोजपुरी अभिनेता निरहुसा असं म्हणाला की, ‘भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपल्या सर्वांचे आवडीचे संगीतकार धनंजय मिश्रा यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आहे. तुम्ही आमच्या हृदयात सदैव राहालं. ईश्वर आत्म्याला शांती देओ.’

- Advertisement -

आज सकाळी ७ वाजता संगीतकार धनंजय मिश्रा यांचे निधन झाले. त्यांच्यावर मीरा भायंदर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


हेही वाचा – ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासु चटर्जी यांचे निधन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -