घरCORONA UPDATECorona Live Update: रिकव्हरी रेट ४७.९९ टक्के, २४ तासात बरे झाले ३,८०४...

Corona Live Update: रिकव्हरी रेट ४७.९९ टक्के, २४ तासात बरे झाले ३,८०४ रुग्ण

Subscribe

मागच्या २४ तासात देशात ३,८०४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यासोबतच कोरोनातून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून आता १ लाख ४ हजार १०७ झाली आहे. भारतात कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा रिकव्हरी रेट देखील वाढला असून तो ४७.९९ टक्के इतका झाला आहे. देशात आता १ लाख ६ हजार ६३७ Active रुग्ण आहेत.


कोरोना काळात गृहकर्जावरचं व्याजही माफ होणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

देशभरात कोरोनाचं थैमान सुरू झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने जाहीर केलेल्या काही महत्त्वाच्या उपाययोजनांपैकी एक म्हणजे कर्जावरची सूट. मोरॅटोरियमच्या माध्यमातून बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे इएमआय अर्थात हफ्ते आधी ३ महिने आणि नंतर ३ महिने असे एकूण ६ महिने पुढे ढकलण्याचा पर्याय आता कर्जदारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत हे हफ्ते भरण्यापासून कर्जदारांना सूट मिळाली आहे. मात्र, असं असलं, तरी या काळात कर्जावर आकारण्यात येणारं व्याज मात्र वसूल करण्याची परवानगी बँकांना देण्यात आली आहे. पण आता हे व्याज देखील माफ करण्यात यावं अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली, लोक सत्य बोलायला घाबरतात

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला. याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. दरम्यान, अर्थव्यवस्थेबाबत राहुल गांधी तज्ञांशीही चर्चा करत आहेत. राहुल गांधींनी आज बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी चर्चा केली. या वेळी राजीव बजाज म्हणाले की लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा आघात झाला आहे. तसंच लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारतातील लॉकडाऊन इतर देशांपेक्षा वेगळा आहे. भारतात एक प्रकारचा ड्रेकीयन लॉकडाऊन आहे, असा लॉकडाऊन कोठेही झालेला नाही. जगातील बर्‍याच देशांमध्ये बाहेर जाण्याची परवानगी होती, परंतु आपल्याकडे वेगळी परिस्थिती होती. (सविस्तर वाचा)


कोरोनाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांनाही ५० लाखांचं विमाकवच!

अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना कोरोनाशी लढा देताना जर मृत्यू आला तर ५० लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. मात्र, आता त्यामध्ये पत्रकारांचा देखील समावेश करण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रसार माध्यमे आणि वृत्तपत्रांचा याआधीच कोरोना काळातल्या अत्यावश्यक सेवा म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्यांना पोलिस किंवा आरोग्य सेवकांप्रमाणे विमाकवच देण्यात आलं नव्हतं. यासंदर्भात अनेकदा मागणी देखील करण्यात आली होती. अखेर, राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून त्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

स्थलांतरित मजुरांना मोठा धक्का

स्थलांतरित मजुरांना मोठा धक्का बसणार आहे. कारण श्रमिक विशेष ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी श्रमिक विशेष गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारपर्यंत ४०४० मजुरांच्या विशेष गाड्या चालविण्यात आल्या. त्याचबरोबर राज्यांनी २५६ गाड्या रद्द केल्या. (सविस्तर वाचा)


पिंपरीत ३१ जणांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र, अशा परिस्थितीत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील चिंता वाढवणारी आहे. पिंपरी शहरातील २५ आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या ६ अशा एकूण आणखी ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी दुपारी हाती आलेल्या महापालिकेच्या अहवालानुसार शहरातील १५ पुरुष आणि १० स्त्रियांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८४ वर जाऊन पोहोचला आहे. (सविस्तर वाचा)


देशात २४ तासांत ९,३०४ नवे रुग्ण

देशात कोरोनबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ३०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत २६० जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख १६ हजार ९१९ झाली आहे. त्यापैकी ६ हजार ०७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ०४,१०७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण १ लाख ०६ हजार ७३७ आहेत. (सविस्तर वाचा)

This is the highest single day spike in the number of #COVID19 cases (9304) & deaths (260) in India. https://t.co/EZBy0XFGNt

— ANI (@ANI) June 4, 2020


धारावी कंट्रोलमध्ये, तर माहिम-दादर आऊट ऑफ कंट्रोल

धारावी आणि माहिम-दादर या दोन विधानसभा क्षेत्र असलेल्या महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील अधिकार्‍यांनी आपले सारे लक्ष केवळ आणि केवळ धारावीकडेच केंद्रीत केले. परंतु धारावीतील जनतेची विशेष काळजी घेताना, कुठेतरी येथील महापालिकेच्या अधिकार्‍यांचा माहिम व दादर या विभागांकडे दुर्लक्ष झालेला आहे. सुरुवातील धारावीचा आकडा वाढत असला तरी सध्या येथील रुग्णांची संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. परंतु त्या तुलनेत दैनंदिन आढळून येणार्‍या रुग्णांमध्ये धारावीपेक्षा आता दादर-माहिम खूप पुढे आहे. त्यामुळे धारावीला कंट्रोलमध्ये आणताना माहिम-दादर हा परिसर आऊट ऑफ कंट्रोल होणार नाही ना, याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात बुधवारी २५६० नवे रुग्ण सापडले असून, करोनाबाधितांची संख्या ७४ हजार ८६० झाली आहे. त्याचप्रमाणे १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा २५८७ वर पोहोचला आहे. बुधवारी ९९६ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत ३२ हजार ३२९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -