घरमनोरंजनबिग बॉसच्या घरी रंगतोय सासू सुनेचा खेळ

बिग बॉसच्या घरी रंगतोय सासू सुनेचा खेळ

Subscribe

संसार म्हटलं की, भांड्याला भांड हे लागणारच. अगदी याप्रमाणेच सासू – सुनांच्या नात्यामध्येही खटके उडणे स्वाभाविक आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “घरोघरी मातीच्या चुली” हे कार्य मंगळवारपासून रंगायला सुरुवात झाली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना बिग बॉस नेहेमीच एका पेक्षा एक जबरदस्त सरप्राईझ देत असतात. असंच एक सरप्राईझ काल सदस्यांना मिळालं. घरामध्ये काल कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘घाडगे & सून’ मधील सगळ्यांच्या लाडक्या माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी मोने आणि वसुधा म्हणजेच अतिशा नाईक यांचा प्रवेश झाला. मात्र त्या राहण्यासाठी गेल्या नसून एका विशिष्ट टास्कसाठी गेल्या आहेत.

काय आहे नवा टास्क?

संसार म्हटलं की, भांड्याला भांड हे लागणारच. अगदी याप्रमाणेच सासू – सुनांच्या नात्यामध्येही खटके उडणे स्वाभाविक आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “घरोघरी मातीच्या चुली” हे कार्य मंगळवारपासून रंगायला सुरुवात झाली आहे. या कार्यात उत्तम कामगिरी केल्यामुळं पुष्कर, सई, मेघा, आस्ताद, नंदकिशोर आणि शर्मिष्ठा यांना हिरे देण्यात आले आहेत. आज देखील घरामध्ये हे कार्य रंगणार आहे. पण यामध्ये येणार आहे एक नवा ट्विस्ट. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज वसुधाबरोबर असणार आहे घाडगे & सून मालिकेतील सगळ्यांची लाडकी अमृता. तेव्हा हे कार्य बघणे आज रंजक असणार आहे.

- Advertisement -

आजही जावई – सुनांना करायचा जाच

आजदेखील सासू सासऱ्यांना त्यांच्या जावई सुनांना सतवायचे आहे. मात्र आज टीम्समध्ये अदलाबदल करण्यात येणार आहे. टीम सून – जावयाचे नेतृत्व भाग्यश्री तर टीम सासू – सासऱ्यांचं नेतृत्व अतिशा नाईक करणार आहेत. ज्यामध्ये शर्मिष्ठा आणि सईमध्ये तर मेघा आणि पुष्करमध्ये बरेच वाद होणार आहेत. रेशम स्मिताला हिरवी गोळी बनवायला सांगणार आहे. ज्यासाठी स्मिताला पाटा वरवंटा याचा वापर करायचा आहे. आज काय काय घडेल ? कोणामध्ये वाद होतील ? कोणाला जास्त हिरे मिळतील ? हे जाणून घेण्यासाठी बिग बॉस बघणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -