घरमनोरंजन'बिग बॉस १२' शुभारंभाला सलमानचा हटके अंदाज

‘बिग बॉस १२’ शुभारंभाला सलमानचा हटके अंदाज

Subscribe

छोट्या पडद्यावरील बिस बॉस या कार्यक्रमाच्या १२ सीजनचा होणार असून अभिनेता सलमान खानचा हटके अंदाज या कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमियरवेळी पाहायला मिळणार आहे.

‘स्वागत नही करोगे सलमान खान का…’ म्हणत छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस १२’ हा रिअॅलिटी शो दाखल होत आहे. बॉलीवूडचा दबंग सलमान खान या कार्यक्रमाची दमदार सुरूवात करण्यास सज्ज झाला आहे. कलर्स वाहिनीवर उद्या, रविवारी रात्री ९ वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार पुढील तीन महिने हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमियरची झलक कलर्स टीव्हीने त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली असून यामध्ये सलमान खानचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये दाखल झालेला सलमान आपल्या लोकप्रीय गाण्यांवर नृत्य करताना प्रेक्षकांना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सलमान खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

- Advertisement -

१३ स्पर्धकांबाबत उत्सुकता 

यंदाच्या सीजनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची घोषणा यापूर्वीच गोव्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली आहे. मात्र हे सेलिब्रिटी कशा पद्धतीने या घरात १३ आठवडे राहतील हे पाहण औस्तुक्याचं ठरणार आहे. शो सुरू होण्यापूर्वीच वाहिनीने एक व्हिडिओ व्हायरल करून चार मुलींची कॅट फाईट दाखवल्याने अगदी पहिल्या दिवसापासूनच कार्यक्रमाची रंगत वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रिअॅलिटी शोमसंबंधीचे हे धमाकेदार व्हिडिओ प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत.

- Advertisement -

सलमानच्या फीची चर्चा रंगली 

‘बिग बॉस’ हा हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधीक लोकप्रीय रिअॅलिटी शो असून त्याला टीआरपी देखील चांगली असते. प्रामुख्याने शनिवार आणि रविवारी सलमाना खान घरातील सेलिब्रिटींची शाळा घेण्याकरता येतो. साधारण १३ आठवडे चालणारा हा शो असून यंदाच्या संपूर्ण शो करता सलमान ३६४ कोटी रुपये फी आकारणार असल्याचे समजते. सुपरस्टार सलमान खान ‘बिग बॉस’च्या एका एपिसोडसाठी तब्बल १४ कोटी रुपये आकारत असून ही सर्वाधीक रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. या रकमेसोबतच सलमान खान हायेस्ट पेअर कलाकार झाला आहे. गेल्या वर्षीच्या सीजनमध्ये सलमानने याच शोकरता ११ कोटी रूपये घेतले होते. तर यंदाच्या शोसाठी त्याने एका एपिसोडकरता १९ कोटीची मागणी केली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -