घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धानरेंद्र धनकरघरे यांच्या बाप्पाला वारली कलेचा साज

नरेंद्र धनकरघरे यांच्या बाप्पाला वारली कलेचा साज

Subscribe

कल्याणच्या पंचमुखी मारुती कॉलनीमध्ये राहणाऱ्या नरेंद्र धनकरघरे यांच्या घरी इको फ्रेंडली बाप्पा विराजमान झाले आहेत. घारे यांच्या बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीची आहे. मूर्तीच्या सजावटीसाठी पुठ्ठा आणि कागदाचा वापर केला आहे. घारे यांच्या घरी गेल्या २० वर्षांपासून इको फ्रेंडली बाप्पाची प्रतिष्ठापना केली जात आहे. त्यांच्या घरी १० दिवस बाप्पाचे वास्तव्य असते. यंदा बाप्पाच्या सजावटीसाठी वारली कलेचा साज चढवण्यात आला आहे. गेली ९ वर्षे घारे यांच्या घरी बाप्पासाठी इको फ्रेंडली सजावट केली जात आहे.

नरेंद्र धंकरधरे यांची पर्यावरण संवर्धनाची तळमळ आपल्यालाही आवडेल. त्यांच्या या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण त्यांना वोट करा. वारली कलेचा इतिहास आणि माहिती इतक्या कलात्मकतेने मांडणाऱ्या नरेंद्र धंकरधरे यांच्या बाप्पाला एक वोट मिळाले पाहीजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -