घरदेश-विदेशतुमच्याही डिजिटल घड्याळात असू शकतो छुपा कॅमेरा!

तुमच्याही डिजिटल घड्याळात असू शकतो छुपा कॅमेरा!

Subscribe

एका घड्याळात छुपा कॅमेरा लपवून एका प्रेमी युगुलाचं चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एअर बीएनबी (Airbnb) या आघाडीच्या हॉस्पिटॅलिटी सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या माध्यमातूनच निवडलेल्या हॉटेलामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हल्ली भिंतीवर काट्याच्या घड्याळांऐवजी डिजिटल घड्याळांची फॅशन जोरात सुरू आहे. लालभडक रंगातले आकडे अनेक घरांच्या भिंतींवर, टेबलावर किंवा शोकेसमध्ये दिसून येतात. पण ही घड्याळं तुमच्या खासगी आयुष्यात दखल देणारीही ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अशाच एका घड्याळात छुपा कॅमेरा लपवून एका प्रेमी युगुलाचं चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एअर बीएनबी (Airbnb) या आघाडीच्या हॉस्पिटॅलिटी सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या माध्यमातूनच निवडलेल्या हॉटेलामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी कंपनीकडून खुलासा देण्यात आला असून संबंधित हॉटेलला कंपनीच्या पोर्टफोलिओवरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच, याप्रकरणी एअर बीएनबीकडूनही तपास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता जर कुठे तुम्हाला ही डिजिटल घड्याळं दिसली, तर जरा जपूनच!

घड्याळात चमकली छोटी लाईट!

स्कॉटलंडचं एक जोडपं कॅनडाच्या एका रिसॉर्टमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी उतरलं होतं. पण चेक इन केल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत ते जोडपं रुममधून बाहेर पडलं. आणि त्याला कारण होतं त्या रूममध्ये लावलेलं डिजिटल घड्याळ! हॅमिल्टन आणि त्याची गर्लफ्रेण्ड रूममध्ये शिरले त्या क्षणापासून हॅमिल्टनचं लक्ष त्या डिजिटल घड्याळाकडे होतं. खूप निरीक्षण केल्यानंतर त्याला लक्षात आलं की घड्याळाच्या आत डिजिटल आकड्यांच्या लाईटसोबतच एक छोटीशी लाईटही चमकत आहे. शिवाय घड्याळाच्या मागून एक वायरही दुसऱ्या कुठल्यातरी छोट्या डिव्हाइसला जोडली असल्याचंही त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे संशय येऊन अखेर त्याने घड्याळाचा पुढचा भाग काढल्यानंतर आतमध्ये छुपा कॅमेरा लावल्याचं त्याच्या लक्षात आलं.

आम्हाला त्या रूममध्ये जाऊन फक्त २० मिनिटं झाली होती. माझं त्या घड्याळाकडे लक्ष गेलं. त्यावेळी माझ्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं, ज्यामुळे मला अस्वस्थ वाटू लागलं आणि मी घड्याळ उघडलं.

हॅमिल्टन, तक्रारदार

- Advertisement -

तुम्हालाही दिसू शकतो छुपा कॅमेरा!

हॅमिल्टनने सांगितल्यानुसार, सदर डिजिटल घड्याळामध्ये लावलेला कॅमेरा त्या रुममधला हॉल आणि बेडरूम यांच्याकडे तोंड करून होता. त्यामुळे तिथली सर्व दृश्य त्या कॅमेऱ्यात टिपली जात होती. ही घटना जरी स्कॉटलंडमध्ये घडलेली असली, तरी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कोणतंही नवीन तंत्रज्ञान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे, आज कॅनडामध्ये डिजिटल कॅमेऱ्यात सापडलेला छुपा कॅमेरा उद्या आपल्याकडच्याही कोणत्यातरी डिजिटल घड्याळामध्ये सापडू शकतो. त्यामुळे कुठेही नवीन ठिकाणी गेलात, तर पुरेशी तपासणी केल्यानंतरच रिलॅक्स व्हा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -