Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ब्रेकअपनंतर आमिरची मुलगी पुन्हा प्रेमात, फिटनेस कोचलाच करतेय डेट

ब्रेकअपनंतर आमिरची मुलगी पुन्हा प्रेमात, फिटनेस कोचलाच करतेय डेट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान सर्वा लोकप्रिया स्टार किड्सपैकी एक आहे. अजूनही इराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोअर्स आहेत. इराने आपल्या एक्स बॉयफ्रेंड मिशाल कृपलानीसोबत फोटो शेअर करून सोशल मीडियावर ती खूपच चर्चेत आली होती. पण डिसेंबर २०१९मध्ये इरा आणि मिशाल यांचा ब्रेकअप झाला आहे. २३ वर्षांच्या इराने आपल्या ब्रेकअपबाबत इस्टाग्रामवर पोस्ट देखील शेअर केली होती. पण आता पुन्हा एकदा इरा प्रेमात पडल्याचे समोर येत आहे.

मिशाल कृपशालीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर इराला पुन्हा प्रेम झाले आहे. माहितीनुसार कोरोनाच्या काळात इरा नुपुर शिखरे यांच्या प्रेमात पडली आहे. नुपुर शिखरे इराचे वडील आमिर खानचे फिटनेस कोच आहे. सध्या दोघे एकमेकांना ५ महिन्यांपासून डेट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

- Advertisement -

इरा आणि नुपुर लॉकडाऊन दरम्यान एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यातील बाँडिग मजबूत झाली. काही दिवसांपूर्वी इरा आणि नुपुरने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते दोघे वर्कआऊट करताना दिसत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

अलीकडेच इरा आणि नुपुर आमिर खानच्या महाबळेश्वरच्या फार्महाऊसवर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत खूप सारा वेळ घालवला होता. माहितीनुसार इराने नुपुरची भेट आपली आई रीना दत्तसोबत करून दिली आहे. यावर्षी इरा आणि नुपुरने दिवाळी देखील एकत्र साजरी केली.


- Advertisement -

हेही वाचा –  ९३ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘जल्लीकट्टू’ चित्रपटाला नामांकन


 

- Advertisement -