घरताज्या घडामोडीअनुपम खेर यांनी नसीरुद्दीन शहा यांना दिलं चोख प्रत्युत्तर

अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन शहा यांना दिलं चोख प्रत्युत्तर

Subscribe

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर ट्विटरवर खूप अॅक्टिव्ह असतात. ते देशातील सुरू असलेल्या प्रत्येक मुद्द्यांवर आपले मतं ट्विट करत असतात. त्यामुळे ते खूप चर्चेत असतात आणि त्याचे ट्विट व्हायरल देखील होत असतात. नुकतंच अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटवर लिहिलं की, ‘मी पडलो नाही आणि माझ्या अपेक्षेचा बुरुज देखील पडला नाही. परंतु काही लोक मला पाडण्याच्या प्रयत्नात स्वतःचं पडले.’ त्याच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांना ‘जोकर’ आणि ‘मनोरुग्ण’ म्हटले होते. त्यानंतर अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

सीएए आणि एनआरसीबाबत बोलताना नसीरुद्दीन म्हणाले होते की, ‘अनुपम खेर या मुद्दयाबाबत फारच पुढाकार घेताना दिसत आहे. माझ्या मते त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तो एनएसडी आणि एनएफटीआयआयच्या काळापासून तो एक जोकर असून तो आताही तसाच आहे. त्या काळातील सर्वच सहकाऱ्यांना माहित आहे की, अनुपम हा एक प्रकारचा मनोरुग्ण आहे. हा गुण त्याच्या रक्तातच आहे.’

- Advertisement -

यावरच अनुपम खेर व्हिडिओच्या माध्यमातून आपलं मतं मांडलं आहे. अभिनेत्री ईशा गुप्ता सोबत अनुपम खेर ‘वन डे’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसले होते. या अगोदर अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसले होते.


हेही वाचा – मोदी असंवेदनशील तर अनुपम खेर मनोरुग्ण; नसीरुद्दीन शहा यांची टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -