घरमनोरंजन'नमस्ते लंडन'चा सिक्वल पडला फिका

‘नमस्ते लंडन’चा सिक्वल पडला फिका

Subscribe

नमस्ते लंडनच्या तुलनेत नमस्ते इंग्लंडचे कथानक फिके असल्याची प्रतिक्रिया समीक्षकांकडून येत आहे. उद्या हा चित्रपट प्रदर्शीत होत असून यामध्ये अर्जुन-परिणितीच्या प्रमुख भूमिका आहेत.

खिलाडी कुमार अक्षयचा सुपरहिट चित्रपट नमस्ते लंडन बनवणारे दिग्दर्शक विपुल शहा यांनी त्याचा सिक्वल नमस्ते इंग्लंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर आणला. मात्र पहिल्यापेक्षा याचा दुसरा भाग फिका असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा जादू चालला नसल्याचे समीक्षकांच्या प्रतिक्रीयेवरून समोर येत आहे. याच्या आधीच्या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांना प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती. नव्यानेच चित्रपट क्षेत्रात आलेल्या कतरिनाच्या करिअरमधील हा एक महत्त्वाचा चित्रपट ठरला होता.

Arjun Kapoor and parineeti chopra
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा

अर्जुन आणि परिणितीची प्रमुख भूमिका

‘नमस्ते इंग्लंड’ चित्रपटामध्ये अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा या दोघांच्या प्रमुख भूमिका असून ‘इशकजादे’ चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी दोघे एकत्र येत आहेत. दरम्यान विपुल अमृतलाल शाहच्या २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नमस्ते लंडन’ चा हा सिक्वल आहे. १९ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच आलेल्या त्याच्या रिव्ह्यूमध्ये हा चित्रपच फिका असल्याचे समीक्षकांचे मत आहे. अर्जुन-परिणिती यांनी ‘इशकजादे’या चित्रपटामध्ये ही जोडी एकत्र झळकली होती. या दोघांनीही या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. आपले करिअर घडवण्यासाठी इंग्लंडला गेलेल्या जस्मीतची म्हणजेच परिणितीची ही कथा आहे. आपली पत्नी जस्मीत इंग्लंडला गेल्यावर परम(अर्जुन)ने तिला भेटण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे ‘नमस्ते इंग्लंड’!

- Advertisement -

पोस्टरवरून झाला होता वाद

काही दिवसांपूर्वी ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाचं पोस्टर लॉंच करण्यात असताना त्याच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला होता. या पोस्टरमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यामुळे हा वाद उद्भवला होता. त्यानंतर ही चूक सुधारत नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -