घरमनोरंजनहृतिक रोशनच्या 'सुपर ३०' चा फस्ट लुक

हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चा फस्ट लुक

Subscribe

अभिनेता हृतिक रोशन याने त्याच्या आगामी सुपर ३० चित्रपटाचे फस्ट लुक आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहे.

बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनच्या आगामी ‘सुपर ३०’ या चित्रपटाचा फस्ट लुक नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा’, या टॅग लाईनसोबत हृतिकचा रावडी लुक या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने हृतिक रोशन याने त्याच्या इंस्टाग्रामवर आपल्या नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. रिलायन्स एंटरटेरमेंट प्रस्तुत अनुराग कश्यप, साजीद नाडियलवाला यांच्या निर्मितीत बनणाऱ्या ‘सुपर ३०’ चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले. पुढील वर्षाच्या सुरुवातील म्हणजेच २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

समय बदल रहा है। Welcome to #Super30

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

- Advertisement -

‘या’ ओळी दिल्या पोस्टरसोबत

‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा… अब राजा वही बनेगा जो हकदार होगा!’, ‘समय बदल रहा है! वेल कम टू सुपर ३०’, या ओळींनी चित्रपटाचे पोस्टर हृतिकने त्यांच्या इंस्टावर शेअर केले आहे. तरुणांची टोळी घेऊन युद्धावर निघालेल्या आवेशात हृतिकचा या चित्रपटातील लुक दिसत आहे. ज्याच्या हक्क आहे, त्यालाच सर्वोच्च पद मिळेल, यासाठी लढणाऱ्यांची गोष्ट ‘सुपर ३०’ मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. या चित्रपटात हृतिक रोशन हा आनंद कुमार ही व्यक्तीरेखा साकारत आहे.

 ‘काबील’नंतर मोठा ब्रेक

यापूर्वी हृतिक रोशनचा ‘काबील’ हा चित्रपटा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. २०१७ साली प्रदर्शीत झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मनं जिंकली होती. रोहन या आंधळ्या मुलाची भूमिका साकारणारा हृतिक त्याच्या सहज अभिनयासाठी पुन्हा एकदाा चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. रोमॅंटिक हिरो, चॉकलेट बॉयची इमेज सोडून हृतिक दर्जेदार भूमिकांची निवड करत आहे. त्याचे चाहतेदेखील त्याला या अवतारात पसंत करत आहेत. त्यामुळे ‘सुपर ३०’ चा फस्ट लुकपाहून प्रेक्षक नक्कीच सुपर एक्साइटेड झाले असतील, हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -