घरमनोरंजनआर. के. स्टुडिओची अखेर होणार विक्री

आर. के. स्टुडिओची अखेर होणार विक्री

Subscribe

आर. के. स्टुडिओ हा ७० वर्षीय हा जुना स्टुडिओ लवकरच विकण्यात येणार असल्याचं अभिनेता ऋषी कपूर यांनी सांगितलं आहे

राज कपूर यांचा आर. के. स्टुडिओ सर्वांनाच परिचित आहे. हिंदी सिनेसृष्टीतील शो मॅन म्हणून ओळख असणाऱ्या राज कपूरने १९४५ साली हा स्टुडिओ बांधला होता. मात्र मागच्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी लागलेल्या आगीत चेंबूरमधील आरके स्टुडिओची फारच वाईट अवस्था झाली. दरम्यान यापूर्वी हा स्टुडिओ पुन्हा बांधण्यासाठी कपूर खानदान आणि अन्य बिल्डर्स यांची बोलणी सुरु होती. मात्र आता ७० वर्षीय हा जुना स्टुडिओ लवकरच विकण्यात येणार असल्याचं अभिनेता ऋषी कपूर यांनी सांगितलं आहे. ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राला ऋषी कपूर यांनी आपल्या निर्णयासंदर्भात ही माहिती दिली.

कपूर्स खूपच भावनिक पण….

‘सध्या स्टुडिओ बांधून कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही कारण बरेच लोक या बाजूला शूटिंग करण्यासाठी येत नाहीत. अंधेरी अथवा गोरेगावला चित्रीकरण करणं त्यांना जास्त परवडतं. त्यामुळे सद्यस्थितीत आमच्या भावनेचा समतोल साधण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि राज कपूर यांच्या आठवणी नेहमी जागृत ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.’ अशी भावना ऋषी कपूर यांनी यासंदर्भात व्यक्त केली होती. मात्र, तसे काहीच होऊ शकले नाही. कपूर्स खूपच भावनिक आहेत. पण आता हा स्टुडिओ चालवणं म्हणजे एखादा पांढरा हत्ती पोसण्यासारखं असल्याचंही ऋषी कपूर यांनी म्हटलं आहे. ‘दरम्यान आम्हा भावंडांमध्ये अतिशय सख्य आहे. मात्र आमची मुलं आणि पुढची पिढी काय करेल? याबद्दल आम्ही कोणतीच शाश्वती देऊ शकत नाही. आमच्या वडिलांनी खूप प्रेमानं सर्व जपलं आहे, ते सगळं कोर्टकचेऱ्यांमध्ये संपावं असं आम्हाला वाटत नाही. आम्ही आमच्या मनावर दगड ठेऊन अगदी खूप विचार करूनच हा निर्णय घेतला आहे,’ असंही ऋषी कपूर यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -