घरमनोरंजन'तुझ्यात जीव रंगला'तील राणादाच्या वडीलांवर गुन्हा दाखल

‘तुझ्यात जीव रंगला’तील राणादाच्या वडीलांवर गुन्हा दाखल

Subscribe

पीएनजी ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी दस्ताने दाम्प्त्यांवर गुन्हा दाखल

झी मराठी वाहिनीवरील सध्या जोरदार सुरू असणारी नंबर वन मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालत अधिराज्य गाजवले आहे. या मालिकेतील राणादा-पाठक बाई फक्त प्रेक्षकांची लाडकी जोडी नाही तर या मालिकेतील इतर कलाकार देखील प्रक्षकांच्या पसंतीचे आहेत.

हे ही वाचा- ‘चालतयं की’ म्हणणारा राणादा मालिकेतून घेणार एक्झिट?

- Advertisement -

या मालिकेच्या यशाची चर्चा सुरू असताना एक वेगळीच बातमी समोर येत आहे. या मालिकेतील राणादादाचे वडील मंत्री प्रतापराव गायकवाड अर्थात अभिनेते मिलिंद दस्ताने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका नामवंत ज्वेलर्सची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समजतेय.

अभिनेते मिलिंद दस्ताने यांनी पीएनजी ज्वेलर्समधून २५ लाखांचे दागिने खरेदी केले होते. मात्र ती रक्कम न दिल्याने अभिनेते मिलिंद दास्ताने यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. “पीएनजी’ ब्रदर्सचे अभय श्रीकृष्ण गाडगीळ यांनी या संदर्भात तक्रार नोंदवली आहे.

- Advertisement -

गाडगीळ यांच्या औंध भागात असणाऱ्या पीएनजी ज्वेलर्स शॉपमध्ये काही महिन्यांपूर्वी दास्ताने आणि त्यांच्या पत्नीने दागिने, सोन्याचे बिस्कीट, हिरेजडीत अंगठी, चांदीचे दागिने असा एकूण २५ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज खरेदी केला होता. त्यावेळी डोबिंवली भागातील जमिनीची विक्री केल्यानंतर उधारीवर घेतलेल्या दागिन्यांची रक्‍कम परत करेल, असे गाडगीळ यांना सांगितले होते. मात्र नंतर दास्ताने यांनी वेळेवर दिले नाही, ते पैसे देण्यास टाळाटाळ केली. असे गाडगीळ यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, मिलिंद दस्ताने यांच्याकडे पैसे नसतील तर त्यांनी खरेदी केलेला ऐवज परत करावा, अशी मागणी पीएनजी गाडगीळ ज्वेलर्सच्या मालकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -