मोनी रॉयने हॉट अंदाजात साजरा केला ‘व्हॅलेंटाईन डे’

Mumbai
mouni roy swimming video viral actress enjoying in maldives
मोनी रॉयने हॉट अंदाजात साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे'

टिव्ही सिरीयलनंतर मोनी रॉयने आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. मोनी रॉयचे अनेक आयटम साँग हिट झाले आहेत. सध्या मोनी रॉय मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मोनी रॉय या फोटोत वेगळ्या स्टाईल आणि हॉट अंदाजात दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये ती पोहताना दिसत आहे. मोनीचे चाहते तिच्या या फोटोवर खूप प्रतिक्रिया देत आहे. मोनी या फोटोत आणि व्हिडिओत मोनोकिनीमध्ये दिसत आहे.

मोनी रॉयने स्वीम करताचा व्हिडिओ शेअर करताना ‘हॅपी लव्ह डे’ लिहिलं आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांसाठी तिने मासे आणि कासव दाखवले आहेत.

View this post on Instagram

HAPPY LOVE DAY !

A post shared by mon (@imouniroy) on

मोनी रॉयने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली आहे. यानंतर २०१९ मध्ये ‘मेड इन चायना’ आणि ‘रोमिया अकबर वाल्टर’ या चित्रपटात ती दिसली होती. आता मोनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘मुगल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी मोनी रॉय टिव्ही सिरियलमधून फार चर्चेत आली होती. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘देवों के देव महादेव’, ‘नागिन’ यासारख्या सिरियल मधील तिची भूमिका चांगलीचं लोकप्रिय झाली होती.


हेही वाचा – Valentine day: टायगरची बहीण म्हणते, ‘प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे’