व्हायरल होतोय बाथटबमध्ये बसलेल्या परिणीतीचा ‘हा’ फोटो!

'द गर्ल ऑन द ट्रेन' या हॉलिवूड चित्रपटचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

mumbai

बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या चाहत्यांसह आपला बेहद खतरनाक लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये परिणीती एका बाथटबमध्ये बसलेली दिसत असून ती जखमी अवस्थेत या फोटोमध्ये दिसतेय. परिणीतीने शेअर केलेला हा फोटो खूपच भयानक आणि खतरनाक दिसतोय. परिणीतीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि तिचा हा फोटो बघून तिचे फॅन्सदेखील घाबरत आहेत.

हॉलिवूड चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चा रिमेक

परिणीती चोप्रा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाची शुटिंग सध्या लंडनमध्ये होत आहे. परिणीतीचा हा नवा प्रोजेक्ट हॉलिवूड चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चा रिमेक आहे. याच चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ती दारूच्या आहारी गेलेल्या महिलेची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

असा आहे फर्स्ट लूक

पॉला हॉकिन्स यांच्या लोकप्रिय ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या कादंबरीच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. या कथेवर २०१६ मध्ये ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा हॉलिवूडपट बनवण्यात आला. या चित्रपटात अभिनेत्री एमिली ब्लंट मुख्य भूमिका साकारली होती.