घरमनोरंजनपुन्हा आली प्रिया वरियर, ओणमसाठी स्पेशल फोटो!

पुन्हा आली प्रिया वरियर, ओणमसाठी स्पेशल फोटो!

Subscribe

नुकताच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ओणमच्या निमित्ताने प्रियाने पांढऱ्या साडीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत आहे.

तिने एक डोळा मारला आणि सगळे घायाळ झाले. तिची एक अदा बघण्यासाठी तिचे चाहते कायमच आतूर असतात. ही इंटरनेट सेन्सेशन मल्याळम अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वारियर! प्रियाच्या अदांमुळे तिने तिचं वेगळं स्थान आपल्या चाहत्यांच्या मनात निर्माण केलंय.

?

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

नुकताच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ओणमच्या निमित्ताने प्रियाने पांढऱ्या साडीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत आहे. प्रिया नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी असे छान छान फोटो शेअर करत असते.

- Advertisement -

केरळवासियांनाही प्रियाची साथ

सध्या केरळ मोठ्या संकटातून जात आहे. केरळामधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रिया पुढे सरसावली आहे. प्रियाने पूरग्रस्तांना १ लाख रुपयांची मदत दिली आहे. तिने तो फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

- Advertisement -

तो व्हायरल व्हीडिओ ठरला लकी

‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया एका रात्रीत स्टार झाली. या क्लिपने प्रियाला लोकप्रियता मिळाली. तिचे हजारो लोक चाहते झाले. ही क्लिप वेगाने व्हारल झाली. तिचे एका दिवसात लाखोंनी इन्स्टाग्राम फॉलोअर्स झाले. या फॉलोअर्समुळे प्रिया जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सेलेब्स बनली. प्रियाला डान्स आणि भटकंतीची आवड आहे. ती कायम तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश करावा अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -