घरमनोरंजनप्रियंका चोप्रा होणार अॅव्हेंजर्सची मिस मार्वेल?

प्रियंका चोप्रा होणार अॅव्हेंजर्सची मिस मार्वेल?

Subscribe

अभिनेत्री प्रियंका चोप्राने मार्वेल युनिव्हर्स स्टूडिओद्वारे तयार करण्यात येणाऱ्या चित्रपटात कमला खानची भूमिका करावी, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. प्रियंका चोप्राने याआधी हॉलिवूडमधील चित्रपटात काम केलं आहे. बेवॉच या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांसमोर आली होती. या चित्रपटातील प्रियंकाचा अभिनय आणि तिचा लूक चाहत्यांना खूप आवडला. त्यामुळे आता प्रियंका चोप्रांकडून चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. मार्वेल युनिव्हर्सने नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात प्रियंकाला कमला खानची भूमिका देण्यात यावी, अशी अपेक्षा प्रेक्षकांनी व्यक्त केली.

डिस्ने स्टूडिओचे प्रमुख बॉब इगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये अॅव्हेंजर्स ४ येणार आहे. त्यात ७ हजारपेक्षा जास्त पात्र असणार आहेत. मार्वेलचे प्रमुख केव्हीन फेज यांच्या माहितीनुसार कमला खान (मिस मार्वल) हे त्यामधील एक पात्र असेल. मार्वेलचे हेड केईन फेज यांनी नुकताच मिस मार्वेल हा चित्रपट तयार करण्याची घोषणा केलीये. २०१९ मध्ये येणाऱ्या कॅप्टन मार्वेल आणि एव्हेंजर्स ४ या चित्रपटावर मिस मार्वेल आधारित असणार आहे. मिस मार्वेल या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असणाऱ्या कमला खानची भूमिका प्रियंका चोप्राने करावी, अशी इच्छा जगभरातील प्रियंकाच्या चाहत्यांनी व्यक्त केलीये. यापूर्वी कमला खान या अॅनिमेटेड कॅरेक्टरला प्रियंका चोप्रा हिने आवाज दिला होता. त्यामुळे आता प्रियंकानेच कमला खानची भूमिका करावी, असं प्रेक्षकांकडून सांगितलं जातंय.

- Advertisement -

नुकताच प्रदर्शित झालेल्या अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर या चित्रपटाला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला. मार्वेल स्टूडिओचा इन्फिनिटी वॉर हा १९ वा चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक केलाय. आतापर्यंत या चित्रपटाने २०० कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केलीये. भारतात सुपरहिरोजची वाढती प्रसिध्दी पाहता एखाद्या भारतीय कलाकाराने हॉलिवूड चित्रपटात सुपरहिरोजची भूमिका साकारावी, असं सर्वांनाच वाटतच असते. त्यामुळे मार्वेल स्टूडिओच्या आगामी चित्रपटात प्रियंकानेच कमला खानची भूमिका साकारावी, अशी अपेक्षा प्रियंकाच्या जगभरातील चाहत्यांनी ट्विटरवरुन व्यक्त केली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -