‘द स्काय इज पिंक’ प्रियांका चोप्राची दमदार एन्ट्री!

या चित्रपटात प्रियांकाबरोबरच फरहान अख्तर, झायरा वसीम, रोहित शरफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडणार आहे.

Mumbai

गेले काही वर्ष चित्रपटसृष्टीपासून लांब असणारी प्रियांका चोप्रा ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. प्रियांका चोप्राचा कमबॅक चित्रपट म्हणून हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रियांकाबरोबरच फरहान अख्तर, झायरा वसीम, रोहित शरफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडणार आहे.

‘द स्काय इज पिंक’ चित्रपटात आई- वडिलांच्या लव्ह- स्टोरीत स्वत:ला खलनायक मानणाऱ्या मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. आपणच आपल्या आई – वडिलांचे विहीलन आहोत असं तीला सारखं वाटत असतं. चित्रपटाची कथा फरहान- प्रियांकाबरोबरच झायरा वसीमच्या भोवती फिरते. झायरा फरहान आणि प्रियांका चोप्राच्या मुलीची भूमिका साकारत आहे. झायरा फरहान आणि प्रियांका चोप्राच्या मुलीची भूमिका साकारत आहे. ती तिच्या आई-वडिलांच्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी स्वतःला दोषी ठरवत असते. झायराला एक गंभीर आजार बळावतो आणि तीला बरं करण्यासाठी दोघांचा संघर्ष चित्रपटात दाखवला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट प्रियांकासाठी कमबॅक असला तरी झायरा वसीमचा हा शेवटचा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वी सोशलमिडीयावर झायराने चित्रपटसृष्टी सोडल्याचा निर्णय जाहीर केला होता. आता खरच झायरा चित्रपटसृष्टी सोडतेय की नाही हे येणारा काळच ठरवेल.