काही दिवसांपुर्वी हॉलिवूड चित्रपट ‘द वेडिंग गेस्ट’ यासाठी चित्रित झालेला अभिनेत्री राधिका आपटे आणि अभिनेता देव पटेल या दोघांचा बोल्ड सीन इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘द वेडिंग गेस्ट’ या चित्रपटातून अभिनेत्री राधिका आपटेने हॉलिवूड विश्वात आपले पदार्पण केले आहे. परंतु, आतापर्यंत हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही. तरी देखील राधिकाने नुकताच माध्यमांशी संवाद साधला.
राधिकाने सांगितले की, हॉलिवूड चित्रपट ‘द वेडिंग गेस्ट’ यामधील बोल्ड सीन लीक झाला, कारण लोकांची मानसिकता आणि विचार करण्याची पद्धत चांगली नाही. तसेच राधिका असे देखील म्हणाली की, या चित्रपटामध्ये अनेक चांगले सीन आहेत पण, ते लीक न होता हाच बोल्ड सीन लोकांनी व्हायरल केला आहे.
अभिनेत्री राधिका आपटे आणि अभिनेता देव पटेल या दोघांचा बोल्ड सीन असून या व्हायरल होणाऱ्या बोल्ड सीनमध्ये राधिकाचेच नाव घेतले जात आहे. ३३ वर्षीय राधिका आपटेने याबद्दल नाराजी व्यक्त करत सांगितले की, बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार राधिकाने सांगितले की, ‘द गेस्ट वेडिंग या चित्रपटात आणखी खूप सुंदर सीन आहेत. परंतु लोकांच्या मानसिकतेमुळे फक्त बोल्ड सीन लीक झाला आहे. या सीनमध्ये माझ्यासोबत देव पटेल देखील आहे. पण सीन माझ्या नावानेच लीक होत आहे. पुरुष अभिनेता देव पटेल याच्या नावाखाली हा सीन का लीक झाला नाही’ असा प्रश्न राधिकाने उपस्थित केला.
त्यामुळे, राधिकाला राग आला आणि ती भडकली. यावेळी तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हा सीन लीक करण्याला आणि तो बोल्ड सीन लीक होण्य़ाला फक्त समाजाची वाईट असणारी मानसिकताच याला कारणीभूत आहे.
२०१६ मध्ये आलेल्या ‘पार्चड’ या चित्रपटादरम्यान ही अभिनेत्री राधिका आपटेचा सहकलाकार अदिल हुसैन या सोबतचा बोल्ड सीन व्हायरल झाला होता, त्यावेळी अदिल हुसैनने असाच प्रश्न उपस्थित केला होता. २०१६ मध्ये आलेल्या ‘पार्चड’ या चित्रपटाच्या वेळी देखील राधिका चर्चेत आली होती.