रजनीकांत यांची सेटवर काम करणाऱ्यांसाठी ५० लाखांची मदत!

रजनीकांत यांनी 'फिल्म एम्प्लॉयीज फेडरेशन ऑफ साऊथ इंडिया'ला ५० लाख रुपयांची मदत केली आहे. तर तमिळ स्टार स्टारिया आणि कार्ती यांनी फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साउथ इंडियाच्या कामगारांना १० लाख रुपयांची मदत केली आहे.

Mumbai
rajnikanth

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व सिनेमा, टीव्ही शो, जाहिरातींचं शूटिंग, वेब शोजचं शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईड, इंडियन मोशन प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स ओसोशिएनची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या दरम्यान चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि जाहिरात असे कुठलेही चित्रीकरण करता येणार नाही.

कारण सिनेमांचे, मालिकांचे दिवस रात्र चित्रीकरण सुरू असते. चित्रीकरणासाठी एका ठिकाणी अनेक लोक एकत्र काम करतात. गर्दीच्या ठिकाणी करोनाचा प्रसार होऊ शकतो. यासाठी हा निर्णय घेण्यात आला. निर्माते, कलाकार यांना याचा फटका बसत असला तरी सिनेसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा याचा सर्वाधिक तोटा सहन करावा लागत आहे. या कामगार आणि कलाकार यांच्या आर्थिक मदतीसाठी आता सेलिब्रिटी देखील पुढं येत आहे. सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील सेटवर काम करणाऱ्या कामगार आणि कलाकार यांच्यासाठी आर्थिक देऊ केली आहे.

रजनीकांत यांनी ‘फिल्म एम्प्लॉयीज फेडरेशन ऑफ साऊथ इंडिया’ला ५० लाख रुपयांची मदत केली आहे. तर तमिळ स्टार स्टारिया आणि कार्ती यांनी फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साउथ इंडियाच्या कामगारांना १० लाख रुपयांची मदत केली आहे.

प्रशांत दामलेंनी केलेली मदत

प्रशांत दामले यांनी नाट्यकुटुंबातल्या २३ जणांना प्रत्येकी १०,०००/- रुपये दिले. त्यामुळे तुर्तास का होईना या पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांचा प्रश्न सुटला आहे. सोशल मीडियावरही प्रशांत दामले यांच्या या कार्याचे कौतूक होत आहे. अभिनेता प्रसाद ओक आमि पुष्कर श्रोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रशांत दामले यांचे कौतूक केले आहे.