घरमनोरंजन...आणि रणवीरने ही उचलल्या दीपिकाच्या सँडल्स

…आणि रणवीरने ही उचलल्या दीपिकाच्या सँडल्स

Subscribe

सोशल मीडियावर सध्या जो फोटो व्हायरल होतोय त्या फोटोमध्ये रणवीर सिंह दीपिकाच्या मागे असून त्याने हातात दीपिकाच्या सँडल्स पकडल्याचे दिसत आहे.

बॉलिवूड क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी कोणत्या न् कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरत असतो. बॉलिवूड विश्वात अनेक कलाकार मंडळी विवाह बंधनात अडकले. कलाकारांच्या नात्यांतील चर्चा ही सोशल मीडियाच्या माध्यमांतून त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचत असते. पती असावा तर बॉलिवूड कलाकारांसारखा असे वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटी आपल्या पत्नींची खूप काळजी घेतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही दिवसांपुर्वी आनंद आहूजा आपली पत्नी सोनम कपूरच्या शूजची लेस बांधताना दिसला होता तर रणवीर सिंह आता दीपिका पादुकोनच्या सँडल्स उचलतांना दिसला.

 

View this post on Instagram

 

? @gauriandnainika ? @shaleenanathani ? @sandhyashekar ??‍♀️ @georgiougabriel

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

- Advertisement -

चाहत्यांध्ये चर्चेचा विषय

बॉलिवूडचा सिंबा रणवीर सिंह आणि दिपिकाच्या ६ वर्षापासून असणाऱ्या रिलेशनशिपच्या नंतर मागच्या वर्षी दोघे लग्न बंधनात अडकले. रणवीर आणि दीपिकाचे इटलीमध्ये धुमधडाक्यात विवाह पार पडला होता. या शाही विवाहाचे फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तसाच दीपिका आणि रणवीरच्या एका चुलत भावंडाच्या लग्नातील फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

व्हायरल फोटोवर चाहते फिदा

सोशल मीडियावर सध्या जो फोटो व्हायरल होतोय त्या फोटोमध्ये रणवीर सिंह दीपिकाच्या मागे मागे करत होता. यावेळी सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं ते एका गोष्टीने, ती म्हणजे रणवीरच्या हातात यावेळी दीपिकाच्या सँडल दिसल्या. दीपिकाला साडीत हिल्स असलेल्या सँडलने चालणे अशक्य होत होते. म्हणून रणवीरने दीपिकाच्या सँडल हातात धरल्या. त्यामुळे बघणारेही आश्चर्य चकीत झाले. यावेळी लग्नात दीपिका नेसलेल्या पांढऱ्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती आणि रणवीरने इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. संपूर्ण लग्नात रणवीर दीपिका पादुकोनच्या मागे मागे करताना दिसला. सध्या या दोघांचे लग्नातले फोटो चाहत्यांची वाहवा मिळवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -