video : दीपिकाने रणवीरला बॅटने बदडले

बॉलिवूडमधील सध्या आघाडीची जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. या दोघांना एकत्र स्क्रीनवर बघण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.

Mumbai

अभिनेता रणवीर सिंगने सोशलमिडीयावर एक भन्नाट व्हीडीओ शेअर केला आहे. हा व्हीडीओ बघून तुम्ही देखील पोटधरून हसाल. या व्हीडीओत दीपिका रणवीरला बॅटने मारताना दिसत आहे. हा व्हीडीओ शेअर करताना रणवीर एक मस्त कॅप्शनही दिलं आहे. रणवीर म्हणतो,माझ्या आयुष्यातील गोष्ट रिलआणि रिअलसुध्दा..हा व्हीडीओबघताना हे कपल किती हॅपी गो लकी आहे असच तुम्ही म्हणाल..

बॉलिवूडमधील सध्या आघाडीची जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. या दोघांना एकत्र स्क्रीनवर बघण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. ‘रामलीला’,’बाजीरान मस्तानी’,’पद्मावत’ या चित्रपटानंतर लवकरच ते दोघे पुन्हा एकदा एकत्र झळकायला सज्ज झाले आहेत. नुकतचे दीपिका पदुकोणचे छपाक चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण झाले आहे. आता ती ’८३’ चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका झळकणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने यासंदर्भात ट्वीट केले आहे. ’८३’ चित्रपटात दीपिका आणि रणवीरची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची भुमिका साकारणार आहे. तर दीपिका कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भुमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहेत.

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’८३’ हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here