घरमनोरंजनसलमानच्या रेस ३चं 'हिरिये' गाणं रिलीज!

सलमानच्या रेस ३चं ‘हिरिये’ गाणं रिलीज!

Subscribe

सलमान खानच्या रेस ३ चे ट्रेलर नुकतेच दोन दिवसापूर्वी रिलीज झाले होते. त्यातील ‘हिरिये’ हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं असून हे गाणं सध्या ट्रेंडिंग होत आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा बहुप्रतिक्षित ‘रेस ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एकापेक्षा एक असे सरस कलाकार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान परत एकदा प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी तयार झाला आहे.

‘रेस ३’ मधील ‘हिरिये’ या पहिल्या गाण्याचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा पोलडान्स करताना दिसून येत आहे. आपल्या अदांनी जॅकलिन परत एकदा प्रेक्षकांना घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. या गाण्यासाठी जॅकलिनने पोल डान्स शिकून घेतला असून तिने विशेष मेहनत घेतली असल्याचीदेखील चर्चा होती. आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून जॅकलिनने पोल डान्स शिकत असताना काही व्हिडिओदेखील शेअर केले होते. जॅकलिनबरोबरच सलमानदेखील या गाण्यात आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ठुमके लावताना दिसणार आहे.

- Advertisement -

मीत ब्रदर्स यांनी या गाण्याला संगीत दिले असून नेहा भासीन आणि दीप मोनी यांनी हे गाणं गायलं आहे. रेस – ३ या चित्रपटात सलमान आणि जॅकलिनबरोबरच अनिल कपूर, बॉबी देओल, डेझी शाह, साकीब सलीम अशी तगडी स्टारकास्ट आहे. दरम्यान, ‘रेस ३’ चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर काही प्रेक्षकांनी उचलून धरला तर काही प्रेक्षकांनी टीका केली असून त्यावर बरेच मीम्सदेखील करण्यात आले आहेत. तरीही सध्या रेस – ३ ला सर्वात जास्त व्ह्यू मिळाले आहेत. त्यामुळे हिरिये या गाण्याला किती व्ह्यूज मिळतील याकडेदेखील युजर्सचे लक्ष लागून राहिले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -