घरताज्या घडामोडीसाऊथ सुपरस्टार जयप्रकाश रेड्डी यांचे निधन!

साऊथ सुपरस्टार जयप्रकाश रेड्डी यांचे निधन!

Subscribe

साऊथ सिनेमातील प्रसिध्द अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचं आज हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. जयप्रकाश रेड्डी हे तेलुगू चित्रपटामधील लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता म्हणून ओळखले जातात. त्याच्या निधनामुळे दाक्षिणात्य कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

दाक्षिणात्य कलाकारांसोबत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू यांनीदेखील ट्विट करुन रेड्डींना आदरांजली वाहिली आहे. “जयप्रकाश रेड्डी गुरू यांचं निधन झाल्यामुळे तेलुगू चित्रपट आणि रंगमंच यांनी एक हिरा गमावला आहे. गेले कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि स्मरणात राहतील असे चित्रपट दिले. या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत”, असं ट्विट नायडू यांनी केलं आहे.

- Advertisement -

जयप्रकाश रेड्डी यांनी ब्रह्मपुत्रुडु या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी ‘प्रेमिचुकुंदम रा’, ‘गब्बर सिंह’, ‘चेन्नाकेशवारेड्डी’, ‘सीथाया’ आणि ‘टेंपर’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार जयप्रकाश रेड्डी यांना बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. रेड्डी हे अल्लागड्डा येथील आहेत. १९८० पासून त्यांनी अनेक सिनेमात केले होते. तेलुगु सिनेमात त्यांना जेपी नावाने ओळखले जायचे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -