घरट्रेंडिंगअरे बापरे! सनी लिओनीने केली चोरी

अरे बापरे! सनी लिओनीने केली चोरी

Subscribe

बॉलिवूडमध्ये सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सनी लिओनीने चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या हॉट लुकने घायाळ करणारी सनी लिओनी ही अल्पवधीकाळात खूप लोकप्रिय झाली आहे. सनीने बॉलिवूडमध्ये सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देखील ती तितकीच चर्चेत असते. सातत्याने ती फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. याच सनी लिओनीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे चोरीची. सनीने चोरी केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

याची केली चोरी

काही दिवसांपूर्वी सनी लिओनीने एक चित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे चित्र तिने स्वत: काढल्याचा दावा केला होता. तसेच हे चित्र विकून त्या चित्रातून येणार पैसे ती कर्करोग ग्रस्त रुग्णांना उपचारासाठी देणार होती. मात्र, या चित्राची तिने चोरी केली असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. हे चित्र मलिका फावरे नावाच्या चित्रकाराचे असून तिने हुबेहूब तसेच चित्र काढले, असा आरोप डाएट सब्या या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन करण्यात आला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले डाएट सब्या?

डाएट सब्याने इंस्टाग्रावर एक पोस्ट लिहून सनीवर टीका केली आहे. ‘एखाद्या कलाकाराची मेहनत त्याची परवानगी न घेता चोरणे हे दुष्कृत्य आहे’, असा आरोप डाएट सब्याने केला आहे. या पोस्टमुळे सनीला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जात आहे.

- Advertisement -

काय म्हणाली सनी?

चोरीचा आरोप केल्यानंतर सनीने यावर प्रतिक्रिया दिली की, मी कुठल्याही प्रकारची चोरी केलेली नाही. ते चित्र मला खूप आवडले. त्यामुळे ते पुन्हा एकदा मी रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या चित्राच्या लिलावातून जे काही पैसे येणार आहेत ते पैसे मी कर्करोगग्रस्तांना देणार येणार आहे. तसेच जर कोणालाही माझे चित्र आवडले नसेल तर मला माफ करावे’, अशी प्रतिक्रियाही सनीने दिली आहे.


हेही वाचा – इनाया खेमूचा गोंडस हॅलोविन!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -