Sushant Sigh Rajput: भावाला न्याय मिळवून देण्याची सुशांतच्या बहिणींची मनोकामना

Sushant Singh Rajput and his sisters
सुशांतसिंग राजपूत बहिणींसोबत

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने अतिशय कमी वयात जगाचा निरोप घेतला. बॉलिवूडने एक हरहुन्नरी कलाकार गमावला. तर सुशांतच्या कुटुंबियांनी आपला लाडका मुलगा. सुशांतच्या बहिणींसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. ३ ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे. बहिण – भावाचं नातं अधिक गहिरं करणारा हा सण. सुशांतच्या बहिणींना यावेळी त्यांचा लाडका भाऊ राखी बांधण्यासाठी नसणार आहे. मात्र या सणाच्यानिमित्ताने आमच्या भावाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी मागणी त्याच्या बहिणींनी केलेली दिसते. सुशांतला लवकर न्याय मिळावा म्हणून त्याच्या मोठ्या बहिणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.

 

सुशांतला एकूण चार बहिणी आहेत. मोठी बहिण श्वेता किर्ती सिंह जी अमेरिकेला राहते. तर दुसरी बहिण मीतू सिंह ही मुंबईतच वास्तव्याला आहे. तर नीतू आणि प्रियंका अशा इतर दोन बहिणींची नावे आहेत. सर्वात शेवटी सुशांतचा नंबर लागतो. प्रियंका सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. मोठी बहिण श्वेतासिंहने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो ट्विट केला होता, ज्यामध्ये सुशांतने व्हाईट बोर्डवर तो २९ जूनपासून ध्यानधारणा करणार असल्याचे लिहिले होते.

रक्षाबंधन म्हणजे बहिणीने भावाकडून हट्टाने गिफ्ट घेण्याचा दिवस. तर बहिण भावाला चांगले आरोग्य आणि यश चिंतिते. बदल्यात भाऊ बहिणीचे रक्षण करेल, असे वचन देतो. तीन बहिणींचा छोटा भाऊ असलेल्या सुशांतच्या परिवारासाठी हा सण खूप महत्त्वाचा असायचा. सुशांतच्या सर्व फॅमिली फोटोमधून त्याचे आणि बहिणींचे अतूट नाते दिसून यायचे.

चित्रपटात काम करण्यासाठी सुशांत बहिणींपासून दूर मुंबईत आला होता. मात्र रक्षाबंधनच्या दिवशी बहिणींची राखी त्याच्यापर्यंत पोहोचायची. मात्र यावेळी बहिणींना राखी पाठवता येणार नाही. सुशांत आता अशा जगात गेलाय, जिथे राखी पाठवता येत नाही. राखी नाही तर भावाला न्याय तरी मिळवून देऊ, असा प्रण सुशांतच्या बहिणींनी केला आहे.