घरमनोरंजनVideo: सुशांतच्या 'दिल बेचारा' या शेवटच्या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज

Video: सुशांतच्या ‘दिल बेचारा’ या शेवटच्या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज

Subscribe

काही मिनिटांपूर्वी रिलीज झालेल्या दिल बेचारा या गाण्याला चाहत्यांकडूनही मिळाला चांगला प्रतिसाद...

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अखेरच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. दिल बेचरा गाण्यातील सुशांत सिंह राजपूतची नृत्य आणि अभिनय शैली पाहण्यासारखी आहे. व्हिडिओमध्ये सुशांत जबरदस्त एन्ट्री करताना दिसतोय. विशेष म्हणजे काही मिनिटांपूर्वी रिलीज झालेल्या दिल बेचारा या गाण्याला चाहत्यांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चाहते केवळ सुशांतचे कौतुकच करत नाहीत, तर कमेंटच्या माध्यमातून त्याची आठवण देखील काढत आहेत.

- Advertisement -

‘दिल बेचरा’ गाण्यात सुशांत सिंह राजपूत संजना सांघीसोबत नृत्य करताना दिसत आहेत. यामध्ये त्या दोघांचा अंदाज खूप वेगळा दिसत असून व्हिडिओमध्ये सुशांत आणि संजना सांघीची जोडीही अप्रतिम दिसत आहे. सुशांत आणि संजनाचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टार डिस्नीवर रिलीज करणार येणार आहे. कर्करोगाच्या दोन रुग्णांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन ऑर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित आहे.

सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर चाहत्यांनीही ‘दिल बेचरा’ हा चित्रपट मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित करण्याची मागणी केली होती. ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि आता रिलीज झालेलं पहिलं गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून सुशांतचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

- Advertisement -

दरम्यान सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता. तो दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या सुशांतने २००२ मध्ये महाविद्यालय सोडले आणि मनोरंजन विश्वात काम करण्यास सुरूवात केली होती. तर सुरुवातीला त्याने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करून इन्डस्ट्रीत एन्ट्री केली. यानंतर सुशांतने २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेद्वारे लोकप्रियता मिळवून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होते.


सुशांतची हत्याच झाली; आत्म्याशी बोलल्याचा पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -