घरमनोरंजनहार्वड विद्यापीठाने दिलं तनुश्री दत्ताला निमंत्रण!

हार्वड विद्यापीठाने दिलं तनुश्री दत्ताला निमंत्रण!

Subscribe

या महिन्यात पार पडणाऱ्या हार्वड विद्यापीठाच्या भारतीय परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण तनुश्रीला विद्यापीठातून आले आहे.

खूप वर्षांनंतर भारतात परतलेल्या तनुश्रीनं आपल्यावर झालेल्या अन्यायाला जगासमोर आणले आणि ‘मीटू मोहीम’ सुरू झाली. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तिने गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर अनेक महिला समोर आल्या आणि बॉलिवूडचे वास्तव समोर आले आहे. या महिन्यात पार पडणाऱ्या हार्वड विद्यापीठाच्या भारतीय परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण तनुश्रीला विद्यापीठातून आले आहे. तनुश्रीने दिलेल्या माहितीनुसार, तिने हे आमंत्रण स्वीकारले आले. या परिषदेत स्त्रियांवर होणारे अत्याचार, तिचा आजपर्यंतचा प्रवास आणि मीटू मोहीम यासारख्या विषयांवर ती आपले मत ठेवणार आहे.

तनुश्री दत्ताने काय केली होती तक्रार?

ऑक्टोबर २०१८ मध्ये तनुश्रीने नाना पाटेकर आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य या दोघांवरही असभ्य वर्तणुकीचे आरोप केले होते. तनुश्रीने केलेल्या आरोपांनंतर अनेक बॉलिवूड कलाकार तिला पाठिंबा देण्यासाठी समोर आले आणि हे प्रकरण खूपच मोठ्या प्रमाणात गाजलं देखील होतं. तनुश्रीच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे अनेक महिलांनी, बॉलिवूडमधील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे खरे चेहरे समोर आणले. यामध्ये विकास बहल, पीयूष मिश्रा, सुभाष घाई, साजिद खान, आलोक नाथ यांसारख्या अनेक व्यक्तींचा समावेश होता.तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादामध्ये राखी सावंतदेखील होती. हॉर्न ओके प्लीज या सिनेमीतील गाण्याची रिप्लेसमेंट तनुश्रीला राखी सावंतने केली होती. यानंतर राखी सावंतने तनुश्री दत्ता ड्रग अ‍ॅडिक्ट आणि लेस्बियन असल्याचे सांगितले. जेव्हा तनुश्रीला या आरोपांबद्दल समजले तेव्हा हे सगळं खोटं असल्याच तिने स्पष्ट केले. खऱ्या खोट्याचा निवाडा होण्याआधीच तनुश्री न्यू जर्सीला परतली आहे. तनुश्रीच हार्वड विद्यापीठामधील वक्तव्य हे #MeToo वर अवलंबून असल्याच समजतं आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -