घरमनोरंजन१५ ऑगस्टला अक्षय, जॉन, प्रभास यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार

१५ ऑगस्टला अक्षय, जॉन, प्रभास यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार

Subscribe

स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि प्रभास या तीन सुपरस्टारार यांचे एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार

बॉलिवूडचे तीन सुपरस्टार यांचे एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॉक्स ऑफिसवर १५ ऑगस्ट रोजी बॉलिवूडचे सुपरस्टार अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि प्रभास यांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. स्वातंत्र्यदिनी या तीन सुपरस्टारचे चित्रपट प्रदर्शित होत असून चाहत्यांमध्ये या चित्रपटांबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. तसेच सर्वत्र या तीन चित्रपटांबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे. भारताने केलेल्या मंगळ मोहिमेच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. ‘मिशन मंगल’ हा चित्रपट बाल्की आणि जगन शक्ती या दोघांच्या दिग्दर्शनाखाली तयार केला जात आहे. या चित्रपटाच्या तारखेत बदल होण्याबाबत चर्चा सुरू होती. पण टि्वटरवर तरण आदर्श याने ‘मिशन मंगल’ या चित्रपटाच्या तारखेच्या निश्चितीबाबतचा खुलासा केला. तसेच त्याने ‘मिशन मंगल’ या चित्रपटातील सर्व स्टारकास्टचा फोटो टि्वटरवर टाकला आहे.

- Advertisement -

तसेच दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याचा ‘साहो’ हा चित्रपट १५ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीथ रेड्डी यांनी केले आहे. प्रभासला आपण ‘बाहुबली’ या चित्रपटात पाहिले आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर प्रभास हा ‘साहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरच्या सुरुवातीलाच श्रद्धा कपूरची झलक पाहायला मिळाली. तसेच नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर हेदेखील या टीझरमध्ये पाहायला मिळाले. टीझर पाहताच क्षणी कळतं की, हा एक अॅक्शन मूव्ही आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच प्रभास आणि श्रद्धा कपूर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

जॉन अब्राहम याचा ‘बाटला हाउस’ हा तिसरा चित्रपट देखील १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. १९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या ‘बाटला हाउस चकमक’ घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. निखिल आडवाणीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. स्वातंत्र्यदिनी हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट धुमाकूळ करेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -