घरट्रेंडिंगVideo: एकेकाळी नेपाळची राजकुमारी राहिलेल्या हिमानीचा मुलींसोबतचा TikTok

Video: एकेकाळी नेपाळची राजकुमारी राहिलेल्या हिमानीचा मुलींसोबतचा TikTok

Subscribe

टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्याचा मोह नेपाळच्या शाही कुटुंबियालाही आवरला आहे. एकेकाळी नेपाळची राजकुमारी राहिलेल्या हिमानी शाह आणि त्यांच्या मुलींचा नेपाळी गाण्यावरील टिकटॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हिमानी या निमित्ताने पहिल्यांदा टिकटॉकवर आल्या आहेत. त्यांची मुलगी पुर्णिमा यांनी माय रिपब्लिका या नावाने टिकटॉक अकाऊंट बनवला आहे. हिमानी या नेपाळच्या शाही घराण्यातील तत्कालीन उत्तराधिकारी माजी युवराज पारस यांच्या पत्नी आहेत.

- Advertisement -

२४ तासात १७ हजार नेटकऱ्यांनी केले लाईक

भारतात जन्मलेल्या हिमानी या व्हिडिओमध्ये पुर्णिमा आणि कृतिका या दोन मुलींसोबत नेपाळी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. गुरूस को फेड मुनी…., असे या गाण्याचे बोल आहेत. सध्या हे कुटुंबिलय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे थायलँडमध्ये अडकले आहते. थायलँडमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना भेटण्यासाठी हिमानी तिथे केल्या होत्या. ४३ वर्षीय हिमानी यांनी मुलीसह काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून हा व्हिडिओ बनवला आहे. सोमवारी हा व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केल्याचे समजते. तसेच हा व्हिडिओ नेपाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे समजते. हे आम्हाला आमच्या आईकडून मिळाले आहे. प्रामाणिकपणे आम्ही हे करत आहोत. आमची आई खुपच खास आहे. असे कॅप्शन या व्हिडिओसोबत पुर्णिमाने दिले आहे. मंगळवार सकाळपर्यंत १७ हजार लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. तर हजारो नेटकऱ्यांनी यावर कमेंट केले आहेत.

हेही वाचा – 

सावधान! रस्त्यात थुंकणे पडणार महागात; ‘ही’ होणार शिक्षा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -