घरक्रीडालंबी रेस के घोडे

लंबी रेस के घोडे

Subscribe

१५ खेळाडूंचा सलग १२ वा मोसम

टी-20 क्रिकेटमध्ये वेगवेगळे विक्रम करणार्‍या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आणखी एक विक्रम जोडला जाणार आहे. २००८ साली सुरू झालेल्या या स्पर्धेत १५ खेळाडू सलग १२ मोसम खेळण्याचा विक्रम करणार आहेत. त्यात १३ भारतीय आणि २ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तीन-साडेतीन तास थरारक सामन्यांसह निखळ आनंद देणार्‍या या स्पर्धेची वर्षाच्या सुरुवातीपासून वाट पाहिली जाते. स्पर्धेच्या तारखा, मैदाने, प्रत्येक संघातील खेळाडू यांच्या यादीपासून ते तिकिटे मिळवण्यापर्यंत क्रिकेट शौकिनांची धडपड सुरू असते. या स्पर्धेने निर्माण केलेल्या ग्लॅमरमुळे खेळाडूंच्या बोलींचे थेट प्रक्षेपणही लाखो चाहते उत्सुकतेने पाहत असतात. अवघ्या २० षटकांच्या या स्पर्धेच्या सामन्यातील प्रत्येक चेंडूवर रोमांचक अनुभव येत असल्यामुळे आपल्या आवडत्या संघाचे सामने पाहण्यासाठी महत्त्वाची कामेही पुढे ढकलण्याचे धाडस केले जाते. गेली ११ वर्षे सातत्याने होत असलेल्या या स्पर्धेत नवनवे विक्रम नोंदवले जात आहेत.

पहिल्या हंगामापासून सातत्याने खेळणारे १५ खेळाडू यंदाच्या मोसमात खेळून नवा विक्रम नोंदवणार आहेत. त्यात महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, युसुफ पठाण, दिनेश कार्तिक, युवराज सिंग, पार्थिव पटेल, मनीष पांडे, रविंद्र जडेजा या भारतीयांसह एबी डिव्हीलियर्स आणि शेन वॉटसन या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

- Advertisement -

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हा चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज सुरेश रैनाच्या नावे आहे. रैनाने आतापर्यंत १७7 आयपीएल सामने खेळले आहेत, तर त्या खालोखाल धोनी १७6, रोहित शर्मा १७३, दिनेश कार्तिक १६८, युसुफ पठाण १६४, रॉबीन उथप्पा १६५, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली १६4,गौतम गंभीर १५४, रविंद्र जडेजा १५४, शिखर धवन १४३, एबी डिव्हिलियर्स १४3, कायरन पोलार्ड १३२, युवराज सिंग १२८, अजिंक्य रहाणे १२६, पार्थिव पटेल १२6, ड्वेन ब्रावो १२२, ब्रँडम मॅक्युलम १०९, मनीष पांडे ११८, शेन वॉटसन ११8, डेव्हिड वॉर्नर ११४, ख्रिस गेल १११, वृद्धीमान सहा ११५, नमन ओझा ११३, विरेंद्र सेहवाग १०४, मुरली विजय १०2 यांनी सामन्यांचे शतक पूर्ण केले आहे.

सर्वाधिक सामने खेळणार्‍या रैनानेच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. रैनाने आतापर्यंत एक शतक आणि ३५ अर्धशतकांच्या सहाय्याने ४९८५ धावा केल्या आहेत. नाबाद १०० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने १८५ षटकारही ठोकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली धावांच्या बाबतीत दुसर्‍या स्थानावर आहे. त्याने १६३ सामन्यांत ४९४८ धावा केल्या आहेत. त्यात ४ विराट शतकांसह ३४ अर्धशतकांचाही समावेश आहे. ११३ ही सर्वोच्च धावसंख्या असलेल्या कोहलीने ३८२ चौकार आणि १५९ षटकार ठोकले आहेत. हिटमॅन रोहित शर्माने १६८ डावात ४४९३ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. रैना, कोहली, रोहितप्रमाणेच गंभीर, रॉबिन उथप्पा, शिखर धवन, धोनी आणि डेव्हिड वॉर्नर यांनीही आयपीलमध्ये चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

- Advertisement -

तसेच षटकारांच्या यादीत विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर असून, त्याने २९२ षटकार फटकावले आहेत. १८७ षटकार मारणारा एबी डिव्हिलियर्स दुसर्‍या तर १८६ षटकार लगावणारा महेंद्रसिंग धोनी तिसर्‍या स्थानावर आहे.

फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजांनीही या स्पर्धेत आपली छाप पाडली असून, श्रीलंकेचा गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा यॉर्कर फेम लसिथ मलिंगा आघाडीवर आहे. मलिंगाने आयपीलमध्ये ११० सामने खेळताना सर्वाधिक १५४ बळी घेतले आहेत. आयपीलच्या इतिहासात दीडशे बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. त्याच्या खालोखाल अमित मिश्राने १४६ बळी घेतले आहेत. त्यासाठी त्याला १३६ सामने खेळावे लागले आहेत. पियुष चावला तिसर्‍या क्रमांकावर असून, त्याने १४४ सामन्यांत १४० बळी घेतले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -