घरलाईफस्टाईलस्वादिष्ट कडीपत्ता चटणी

स्वादिष्ट कडीपत्ता चटणी

Subscribe

कडीपत्ता चटणी रेसिपी

दररोज डब्याला काय द्यावे, असा अनेकदा गृहिणींना प्रश्न पडतो. तसेच दररोज भाजी खाऊन देखील कंटाळा येतो, अशावेळी तुम्ही घरच्या घरी स्वादिष्ट कडीपत्ता चटणी बनवू शकता.

साहित्य

- Advertisement -
  • ४ कप कडीपत्ता
  • १ कप शेंगदाण
  • १ कप सुकखोबर
  • १/४ तीळ
  • लाल तिखट
  • १५ ते २० लसूण पाकळ्या
  • १ मोठा चमचा जीरं
  • थोडीची चिंच
  • चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्यावे. त्यानंतर त्यात सुखेखोबरे आणि तीळ चांगले परतून घ्यावे. त्यानंतर अर्धा चमचा तेल घालून त्यात कढीपत्ता चांगला भाजून घ्यावा. नंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, सुकखोबर, जीर, मीठ, लसूण, चिंच, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून एकजीव करुन घ्यावे. अशाप्रकारे घरच्या घरी कढीपत्ता चटणी तयार. ही चटणी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -