घरलाईफस्टाईलहिवाळ्यात 'या' उपायांनी करा सांधेदुखीवर मात

हिवाळ्यात ‘या’ उपायांनी करा सांधेदुखीवर मात

Subscribe

थंडीच्या काळामध्येवाढलेला सांधेदुखीचा त्रास जवळपास दोन तृतीयांश रुग्णांना सहन करावा लागतो. थंडीमुळे शारीरीक हलचाली मंदाविल्यानेही सांधे अजून जखडल्यासारखे वाटतात. मात्र यावर उपाय केल्यास या त्रासापासून तुम्ही वाचू शकता.

हिवाळा आणि संधिवात यांचा अगदी जवळचा संबंध आहे. सांधे जखडणे, सुजणे, वेदनापूर्वक हालचाली इत्यादी सांध्याबद्दलच्या अनेक तक्रारी हिवाळ्यात सुरू होतात. थंडीमुळे शारीरीक हलचाली मंदाविल्यानेही सांधे अजून जखडल्यासारखे वाटतात. थंडीच्या काळामध्येवाढलेला सांधेदुखीचा त्रास जवळपास दोन तृतीयांश रुग्णांना सहन करावा लागतो. हा त्रासवरील उपायांमुळे कमी होतो. वेदना कमीझाल्याने तुमचे दैनंदिन काम तुम्हाला सहज करता येते. सर्वसाधारणपणे सांधेदुखीची लक्षणे ६० ते ६५ वर्षेवयोगटातील वृद्धांमध्ये सांधेदुखीची तक्रार दिसून येते. थंड हवामानात सांध्यामधील वेदना, ताठरपणा आणि सूज वाढते. या आजारासाठी कोणताही कायमस्वरूपी उपचार नसल्याने अनेक आरोग्यतज्ज्ञ सांधेदुखीपासून आराम मिळावायासाठी योग्य आणि पोषक आहारावर भर देण्याचा सल्ला देतात.

सांधेदुखीचे व्यवस्थापन करणे सहज शक्य

जसजसा हवामानाचा पारा खाली उतरू लागतो तसतसे सांधेदुखी डोके वर काढू लागते सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी हिवाळा हा वेदनादायक ठरू शकतो. हिवाळ्यामध्ये सांधेदुखी का वाढते या मागची वैज्ञानिक कारणे अनिश्चित आहेत. परंतु या काळात सांधेदुखीच्या रुग्णांची स्थिती क्लेशदायक होते हे नक्की काही सांधेदुखी विषयक संशोधनातून असेसमोर आले आहे की बॅरोमेट्रिक प्रेशर मुळेसांधेदुखी थंडीच्या काळात अधिक बळावते. पण योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेल्या औषधांमुळे सांधेदुखीचे व्यवस्थापन करणे सहज शक्य आहे.

- Advertisement -

हे करा उपाय

1. कायम उबदार रहा : थंडीमध्ये तुमच्या सर्व सांध्यांना उबदार कपड्यांनी लपेटा. सांध्यांना ऊब द्या.

2. व्यायाम : व्यायामा बद्दल तुम्ही जेवढे कमी उदासीन असाल तेवढेच तुमच्या शारिरीक हलचाली सहज होतील. चालणे हासर्वांसाठी सर्वोत्तम उपाय आहे. म्हणूनच घरात असतानाही हालचाल करीत रहा. व्यायाम सांधेदुखीला लगाम घालतो. व्यायामानेतुमची शारीरिक क्षमता लवचिकता वाढीस लागते आणि त्यामुळे वेदना कमी व्हायला मदत होते. मात्र तुमच्याफिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानेच व्यायाम करा. एक चुकीचा व्यायाम तुमचे दुखणे वाढवू शकतो. मी नेहमी माझ्या रुग्णांना हाचसल्ला देतो की तुम्हाला कोणता व्यायाम करायचा आहे हे ठरविण्याआधी तुम्हाला कोणती शारीरिक हालचाल करायची नाही आहेहे शिकून घ्या.

- Advertisement -

3. वाफ : सांधेदुखी मध्ये मोलाची मदत करू शकते. बहुतेकदा लोक इलेक्ट्रिक हीटिंग पॅडचा किंवा गरम पाण्याच्या पिशवीचावापर करतात, परंतु हे दोन्ही वापरताना काळजी घ्यायला हवी. कारण या दोन्ही गोष्टी झोपताना अंगाखाली राहून गेल्यातरसांधेदुखीच्या वेदना तर कमी होतील परंतु त्वचा मात्र भाजली जाऊ शकते. या दोन्ही वस्तूंचा वापर पंधरा तेवीस मिनिटांपेक्षाजास्त करू नये. डायबेटिक न्यूरोपथीच्या पेशंटनी वाफेचा अथवा हीटिंगपॅडचा खूप काळजीपूर्वक उपयोग करायला हवा.

4. आरोग्यदायी आहार: नेहमी संतुलित आहार घ्या. ओमेगा३, फॅटीअॅसिडस, व्हिटॅमिनके, आणि व्हिटॅमिन सी आर्थ्रायटिसच्यावेदनां कमी करण्यात सहाय्यक ठरतील. ओमेगा६ फॅटी अॅसिडस असलेले खाद्यपदार्थ शक्यतो टाळा त्याच्यामुळे सांधेदुखी जास्तहोऊ शकते.

5. भरपूर पाणी प्या: शरीरातील पाण्याची कमतरता झाल्याने सांधेदुखीमध्ये वेदना जास्त वाढवू शकतात. म्हणून भरपूर पाणीप्या.

6. वजन कमी करा: कमी शारीरिक हालचालीमुळे सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. वजनअसल्यास वेदनांमध्ये ही वाढ होते म्हणून वजन नियंत्रणात ठेवा.

7. पूरकजीवनसत्वे: व्हिटॅमिनडीच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा आजार बळावू शकतो मात्र पूरक जीवनसत्त्वे आपल्याआरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या –

डॉ मनन गुजराती, ऑर्थोपेडिक, एसआरव्ही ममता हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -