घरलाईफस्टाईलवजन घटवण्यासाठी जवसाचे पाणी लाभदायक!

वजन घटवण्यासाठी जवसाचे पाणी लाभदायक!

Subscribe

जाणून घ्या जवसाच्या पाण्याचे फायदे

हल्ली बऱ्याच जणांच्या तोंडून वजन वाढल्याचे बोले जाते आणि हेच वजन हटवण्यासाठी देखील अनेक प्रकारे प्रयत्न करण्यात येतात. मात्र, काही केले तरी वजन काही केल्या कमी होत नाही. तुम्हाला सुद्धा हीच समस्या जाणवत असेल तर अत्यंत कमी पैशात उपलब्ध असलेल्या आणि घरगुती वापरातील जवस या पदार्थाचा वापर करुन तुम्ही तुमचे सहज वजन कमी करु शकता.

असा तयार करा जवसाचे पाणी

अर्धा लीटर पाणी घेऊन ते गरम करा. त्या पाण्याला उकळ आल्यानंतर त्यात अर्था कप जवस घाला. त्यासोबत त्यात दालचीनीचा एक तुकडा घाला आणि ३० मिनिटे उकळत ठेवा. त्यानंतर गॅस बंद करुन पाणी गाळून घ्या. त्या पाण्यात मध आणि लिंबू घाला आणि हे पाणी दिवसातून २ वेळा घ्या.

- Advertisement -

कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

जवसाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

रक्तपुरवठा

जवसाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे रक्तपुरवठा सुरळतीत होतो. तसेच हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होण्यास देखील मदत होते.

शरीराला आवश्यक घटक मिळतात

जवसाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट्स आणि व्हिटामीन्स असतात जे शरीरासाठी फार उपयुक्त ठरतात. त्यासोबतच आर्यन, मॅन्गनीज यांसारखे शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांचा समावेश असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -